Mahakumbh 2025 Female Naga Sadhu : महिला नागा साधू होणं सोप्पं नाही, असं काय काय करावं लागतं तुम्ही कल्पनाही करू शकत नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
नागा साधूंचं आयुष्य अत्यंत कठीण असतं. नागा साधू बनणं हेदेखील अवघड असतं. त्यासाठी त्यांना अनेक पारंपरिक धार्मिक आव्हानं पेलावी लागतात व परीक्षा द्याव्या लागतात. याआधी केवळ पुरुषच नागा साधू बनू शकत होते; मात्र काही दशकांपूर्वी महिलांनाही नागा साध्वी बनण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर देशात अनेक महिला नागा साध्वी बनल्या.
advertisement
advertisement
सांसारिक जीवनातून ती मुक्त झाली आहे, याचा निर्वाळा महिलेला या परीक्षेत द्यावा लागतो. आतापर्यंतच्या आयुष्याशी आता तिचा कोणताही संबंध नाही हे महिलेला दाखवून द्यावं लागतं. सगळ्या नात्यांपासून ती दूर आली आहे, हे तिला सिद्ध करावं लागतं. तसंच कोणत्याही सोयीसुविधांशिवाय जगण्याची तिला सवय आहे हेही सिद्ध करावं लागतं. सांसारिक जीवनातली मोहमाया, सुखदुःखांपासून तिला दूर व्हावं लागतं, तरच ती महिला नागा साध्वी बनण्यासाठी पात्र होते.
advertisement
advertisement
यात डोक्यावरचे केस काढावे लागतात. त्यांच्या कपाळावर एक टिळा लावावा लागतो. अंगावर केशरी रंगाचं, लांब, न शिवलेलं वस्त्र घालण्याची परवानगी असते. त्यांना केवळ एकच वस्त्र परिधान करण्याची परवानगी असते, एक हत्यारही महिलेला देतात. अतिशय साधं जीवन जगतात. साधं अन्न त्या खातात व नेहमी जमिनीवर झोपतात. त्यासाठी चादर किंवा चटईचा वापर त्या करतात.
advertisement
advertisement
advertisement
या नागा साध्वी इतर वेळी सर्वसामान्यांच्या समोर येत नाहीत. केवळ कुंभमेळ्यांमध्ये त्या लोकांसमोर येतात. नागा साध्वींनाही पुरुष नागा साधूंइतकाच आदर व मान सन्मान मिळतो. कुंभमेळ्यामध्ये नागा साध्वी इतर साध्वींसह स्नान करतात. महिलांच्या स्नान करण्याच्या ठिकाणी पुरुष नागा साधूंना जाण्यास बंदी असते. पुरुष नागा साधूंचं स्नान झाल्यावर महिलाचं स्नान होतं. कुंभमेळ्यात शाही जुलूस निघाल्यावर पुरुष नागा साधूंच्या दलाच्या मागे नागा साध्वी निघतात.
advertisement