लंडनच्या इस्कॉन मंदिराच्या रेस्टॉरंटमधील ही घटना आहे. एक तरुण केएफसी चिकन घेऊन इथं घुसला. तिथंच तो खाऊ लागला इतकंच नव्हे तर त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि तिथं जेवत असलेल्या ग्राहकांनाही त्याने चिकन ऑफर केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण फूड पॅकेट हातात घेऊन इस्कॉनच्यागोविंदा रेस्टॉरंटमध्ये जातो. तिथं तो थेट फूड काउंटरवर जातो आणि तिथं उभ्या असलेल्या दोन महिलांना नॉनव्हेज फूड आहे का? असं विचारतो. त्यावर त्या महिला हे शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट असल्याचं सांगतात. मांस, कांदा, लसूण काहीच नाही, असं सांगतात. काउंटरवर उभी असलेली महिला त्याला रेस्टॉरंटच्या बाहेर असलेल्या बोर्डकडे बोट दाखवले, ज्यावर शुद्ध शाकाहारी लिहिलेलं होतं.
advertisement
हे पदार्थ खाऊन ज्या महिलेशी संबंध, तिचा मृत्यू, इराण-इस्राइल-तुर्कीहून भारतात आला तो नाश्ता
त्यानंतर तो तरुण त्याच्या हातात असलेल्या बॅगेतून एक बॉक्स काढतो आणि त्यातून चिकन बाहेर काढतो. काउंटरवर उभ्या असलेल्या महिलेने त्याला विचारले की ते काय आहे, तेव्हा तो तिला सांगतो की ते चिकन आहे. केएफसीचं फ्राइड चिकन असतं. ते तो काऊंटरवर ठेवतो आणि खायला सुरुवात करतो. ती महिला त्याला ताबडतोब निघून जायला सांगते, पण तो निघून जाण्याऐवजी रेस्टॉरंटमध्ये फिरतो आणि चिकन खातो इतकंच नाही तर तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांनीही तो चिकन ऑफर करतो.
नंतर कसंबसं करून रेस्टॉरंटचा कर्मचारी त्याला तिथून बाहेर काढतो. बहुतेक लोकांनी या व्यक्तीच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे आणि त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
अखेर त्या दोन मुलींचा बाप सापडला, गोकर्णच्या गुहेत राहाणाऱ्या रशिन महिलेसंदर्भात मोठा खुलासा
इस्कॉन म्हणजे इंटरनेशनल सोसाइटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस. जगभरात श्रीकृष्णाचे असंख्य भक्त आहेत. या सर्वांसाठी स्थापन करण्यात आलेली ही एक आंतरराष्ट्रीय संस्था इस्कॉनची स्थापना 1966 मध्ये न्यूयॉर्क शहरात झाली, तिचे संस्थापक श्री मूर्ती अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद होते.
इस्कॉन मंदिराचे अनुयायी प्रामुख्याने चार गोष्टींना आपला धर्म मानतात. दयाळूपणा, सत्य, मनाची शुद्धता आणि तपश्चर्या. चार नियमांचं ते पालन करतात.
1. इस्कॉन मंदिराचे अनुयायी कांदा, लसूण, मांस, मद्य यांसारखे तामसिक अन्न सेवन करत नाहीत.
2. या लोकांना अनैतिक वर्तन असलेल्या गोष्टींपासून दूर राहावे लागते.
3. प्रत्येकाने एक तास नियमितपणे शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. ज्यामध्ये आपण गीता आणि भारतीय धर्माशी संबंधित धर्मग्रंथ वाचतो.
4. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे महामंत्राचा 16 वेळा जप करतात.