डिसेंबर महिन्यात घडलेली ही घटना आहे. ख्रिसमसचा दिवस... वर्षातील सगळ्यात आनंदाचा दिवस. पण यूएसच्या उत्तर कॅरोलिनामधील जर्मनटन इथं राहणाऱ्या कुटुंबासाठी हा दिवस भयानक ठरला. चार्ली डेव्हिस लॉसन नावाच्या व्यक्तीचं हे कुटुंब. तो व्यवसायाने तंबाखू उत्पादक होता. फोटोत त्याच्यासोबत त्याची पत्नी फॅनी आणि त्याची सात मुलं आहेत. 25 डिसेंबर 1929 रोजी चार्लीने हे खास फोटोशूट करून घेतलं.
advertisement
चार्लीच्या दोन मुली कॅरी (वय 12 वर्षे) आणि मेबेल (वय 7 वर्षे) त्यांच्या काका-काकीला भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या आणि दोघींवरही बंदुकीने हल्ला झाला. दोघींनी निर्दयीपणे मारहाण करून मारण्यात आलं. त्यांचा मृतदेह बागेत फेकून देण्यात आला. त्यानंतर चार्लीची पत्नी फॅनी (वय 37 वर्षे) जी घरी होती तिच्यावरही गोळी झाडण्यात आली. त्यानंतर त्यांची मोठी मुलगी मेरीचीही हत्या करण्यात आली. लहान मुलगा जेम्स (वय 4 वर्षे) आणि रेमंड (वय 2 वर्षे) यांनाही असंच क्रूरतेने मारण्यात आलं. 4 महिन्यांची मुलगी मेरी लू हिलाही सोडलं नाही. निष्पाप मुलीचं डोकं आपटून तिला मारून टाकलं.
5 प्रश्न विचारले, एकाचंही उत्तर आलं नाही, व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, नेमकं प्रकरण काय?
कुटुंबातील मोठा मुलगा आर्थर ज्याला चार्ल्सने हत्याकाडांच्या आदल्या रात्री काही कामासाठी बाहेर पाठवलं होतं. तो घरी परतल्यानंतर घरातील भयानक दृश्य त्याने पाहिलं. सगळे मृतदेह हात जोडून ठेवण्यात आले होते आणि त्यांच्या डोक्याखाली दगड ठेवले होते. जणू काही विचित्र विधी केला गेला होता. आर्थरने पोलिसांना याची माहिती दिली आणि तपास सुरू झाला.
या मृतदेहांमध्ये चार्ल्सचा मृतदेह नव्हता त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. त्याचवेळी जंगलातून गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला. तिथं चार्ल्सचा मृतदेह होता. मृतदेहाजवळील एका झाडाभोवती पायांचे ठसे होते जणू तो मरण्यापूर्वी अस्वस्थपणे फिरत होता. तसंच मृतदेहासोबत पत्रंही आढळलं.
मुलाचं लग्न, कौतुकाने सुनेला पाहत होती, नवरीच्या हातावर नजर पडली अन् सासू किंचाळूच लागली
तुम्हाला वाचून धक्का बसले, संपूर्ण कुटुंबाला संपवणारा दुसरातिसरा कुणी नाही तर चार्ली स्वतःच होता. लोकांच्या मनात एक प्रश्न होता की चार्लीने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला का मारलं? याचं उत्तर सुमारे 60 वर्षांनी बाहेर आलं. 1990 मध्ये लॉसन कुटुंबातील नातेवाईक असलेल्या स्टेला बॉल्स नावाच्या महिलेने हे रहस्य उघड केलं.
स्टेलाने सांगितलं की तिच्या आईने आणि त्या काळातील महिलांनी चर्चा केली होती की चार्लीची पत्नी फॅनीला तिच्या मुली आणि पतीमधील संबंध कळले होते. खरंतर चार्ली त्याची स्वतःची मुलगी मेरीचं शोषण करत होता. मेरीने हे रहस्य तिची मैत्रीण एला मे जॉन्सनलाही सांगितलं होतं. तिने सांगितलं होतं की ती प्रेग्नंट आहे आणि हे मूल तिच्या स्वतःच्या वडिलांचं आहे. जेव्हा फॅनीला हे कळलं तेव्हा कुटुंबात तणाव वाढला. भीती आणि लाजेमुळे चार्लीने विचार केला की हे रहस्य बाहेर येण्यापूर्वी सर्वांना मारलं पाहिजे आणि म्हणूनच त्याने ख्रिसमसच्या दिवशी त्याने स्वतःच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.