जपानमधील ही घटना आहे. 33 वर्षीय होनकॉन एक म्युझिक प्रोड्युसर आहे. त्याला फरारी 458 स्पायडर कार खूप आवडली होती. त्याने त्या कारसाठी तब्बल 10 वर्षे पैसे साठवले. 16 एप्रिल रोजी त्याने ती कार 2.5 कोटी रुपयांना खरेदी केली. गाडी घेऊन तो ऐटीत निघाला. पण टोकियोच्या शुतो एक्स्प्रेसवर असताना अचानक त्या गाडीला आग लागली. कोट्यवधी रुपयांची कार त्याच्या डोळ्यादेखत पेटली. त्याने लगेच गाडी थांबवली आणि तो गाडीतून खाली उतरला.
advertisement
ज्याने हे गाणं ऐकलं त्याचा मृत्यू झाला, 62 वर्षांनंतर उठवला बॅन, चुकूनही ऐकू नका
20 मिनिटांत आग विझवण्यात आली, पण तोपर्यंत गाडी पूर्णपणे आगीत जळून खाक झाली होती. फक्त समोरचा छोटासा भाग दिसत होता. आग का लागली याबद्दल कोणतीही माहिती नाही. आग लागण्यापूर्वी गाडीला अपघात झाला नव्हता.
त्या माणसानं सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर करून आपले दुःख व्यक्त केलं. त्याने लिहिले की डिलिव्हरी झाल्यानंतर अवघ्या एका तासात त्याच्या गाडीला आग लागली. द सन वेबसाइटशी बोलताना होनकॉन म्हणाला की, असं काही घडेल याची त्याने कधीच कल्पना केली नव्हती. त्याला वाटतं की जपानमध्ये तो एकमेव व्यक्ती असेल ज्याला इतकं दुःख सहन करावं लागलं असेल.
Shocking! परफ्युममुळे महिलेला कापावे लागले हातपाय, असं घडलं काय?
या अपघातात होनकॉनला दुखापत झाली नाही आणि तो पूर्णपणे बरा आहे याबद्दल लोकांनी सोशल मीडियावर कमेंट केल्या आणि समाधान व्यक्त केलं. एकाने म्हटले की फरारीच्या बाबतीत असं घडायला नको होतं. त्यापैकी एकाने सांगितलं की तो सुरक्षित आहे हे चांगलं झालं.