आग्नेय आशियातील बेट देश थायलंडमधील ही विचित्र प्रथा. नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर या प्रथेबाबत नवीन वादाला तोंड फुटलं आहे. ते पुस्तक म्हणजे थाई टॅबू – द राइज ऑफ वाइफ रेंटल इन मॉडर्न सोसायटी: एक्सप्लोरिंग लव्ह, कॉमर्स अँड कॉन्ट्रोव्हर्सी इन थायलंडच्या वाइफ रेंटल फेनोमेनन. जे ला वेरिटे इमॅन्युएल यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात थायलंडमध्ये बायको ठेवण्याची वादग्रस्त प्रथा कशी झपाट्याने वाढत आहे, उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत बनत आहे. तिथल्या महिलांसाठी ते उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे, हे सांगण्यात आलं आहे.
advertisement
मृत्यूचा तमाशा! कुणी जग सोडून गेलं की मृतदेहासमोर येऊन नाचतात महिला
थायलंड हे जगातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. जगभरातील पर्यटक या देशातील सुंदर समुद्रकिनारे पाहण्यासाठी येतात. देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील गरीब मुली पैशासाठी पर्यटकांच्या भाड्याच्या बायका बनतात. हे ट्रेंडसेटर थायलंडच्या पट्टायाच्या रेड लाइट एरिया, बार आणि नाईट क्लबमधून त्यांचा व्यवसाय चालवतात. या महिला प्रामुख्याने बार किंवा नाईट क्लबमध्ये काम करतात आणि त्यांना चांगले ग्राहक मिळाल्यावर त्या भाड्याच्या बायका बनतात. याला बायको ऑन हायर आणि ब्लॅक पर्ल असंही म्हणतात.
एका महिलेचे 2 नवरे, दोघांसोबत एकाच छताखाली राहते; सांगितली कशी आहे मॅरिड लाइफ
थायलंडमध्ये या प्रथेबाबत कोणताही कायदा नाही. हा औपचारिक विवाह नाही, एक प्रकारचा तात्पुरता विवाह आहे. तात्पुरता करार काही दिवसांपासून ते अनेक महिन्यांच्या कालावधीसाठी केला जातो. ज्यामध्ये पैसे देऊन मुलीला काही काळासाठी पत्नी बनवता येतं. मुलगी ठरलेल्या वेळेपर्यंत पत्नीची सर्व कर्तव्ये पार पाडते. महिलेचे वय, सौंदर्य, शिक्षण आणि वेळ यानुसार भाड्याची रक्कम ठरवली जाते. ही प्रथा आता व्यवसायाचे रूप धारण करत आहे.