मृत्यूचा तमाशा! कुणी जग सोडून गेलं की मृतदेहासमोर येऊन नाचतात महिला
- Published by:Priya Lad
Last Updated:
नृत्य करणाऱ्या मुलींकडून कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना लेहेंगा, चोली किंवा शॉर्ट कपड्यांमध्ये येण्याची मागणी केली जाते. पैसे देण्याच्या बहाण्याने ते मुलींना मांडीवर बसवतात.
नवी दिल्ली : लग्न, बर्थडे अशा कार्यक्रमात तुम्ही गाणी आणि डान्सचे कार्यक्रम पाहिले असतील. पण सध्या एक वेगळाच ट्रेंड सुरू आहे. तुम्हाला वाचूनच धक्का बसेल. एखाद्याच्या मृत्यूनंतरही डान्स केला जातो. त्यातही शॉकिंग म्हणजे मृतदेह समोर ठेवून त्यासमोरच महिला डान्स करतात. सध्या बिहारमध्ये असा विचित्र ट्रेंड सुरू आहे.
घरात कोणाचा तरी मृत्यू झाला की लोक डान्स करणाऱ्या मुलींना रात्री नाचण्यासाठी बोलावतात. रात्री 9 ते पहाटे ५ या वेळेत या मुलींना नाचवलं जातं. या कामासाठी एका मुलीला 5 ते 6 हजार रुपये दिले जातात.
या कार्यक्रमांमध्ये आता बंदूकही झाडल्या जातात. नुकताच नालंदा जिल्ह्यात श्राद्धाचा कार्यक्रम झाला. यावेळी डान्सचा प्रोग्राम होता, त्यात बंदुकीच्या गोळ्या झा़डण्यात आल्या. ही गोळी एकाला लागली आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार अशाच कार्यक्रमात नाचणआऱ्या एका मुलीनं सांगितलं की, बिहारमध्ये आता लोक मृत्यूप्रसंगीही लोकांना नाचायला लावतात. बियर जवळ ठेवली जाते आणि त्याच्याबरोबर नृत्य देखील होते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 8 वाजल्यानंतर डान्स सुरू होतो. 12 वाजेपर्यंत बॉलीवूड गाण्यांवर डान्स होतो, त्यानंतर भोजपुरी गाणी सुरू होतात.
advertisement
या नृत्य करणाऱ्या मुलींकडून कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी लेहेंगा-चोली किंवा शॉर्ट कपड्यांमध्ये यावं अशी मागणी केली आहे. पैसे देण्याच्या बहाण्याने ते मुलींना आपल्या मांडीवर बसवून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करतात. भोजपूर, औरंगाबाद, बांका, रोहताससह बिहारमधील अनेक भागात मृत्यूचे नृत्य करण्याचा हा ट्रेंड सातत्याने वाढत आहे.
Location :
Bihar
First Published :
December 21, 2024 3:01 PM IST