भारतात शाकाहार केवळ खाण्याची पद्धत नाही, तर अनेकांसाठी ती एक जीवनशैली आहे. काहीजण तर अंड्यालाही नॉनवेज मानतात. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात असं एक राज्य आहे जिथं तब्बल 75 टक्क्यांहून अधिक लोक केवळ शाकाहारी आहेत? चला तर पाहूया, कोणतं आहे हे 'शुद्ध शाकाहारी' राज्य...
राजस्थान – शाकाहारात अव्वल
नेशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) च्या आकडेवारीनुसार, राजस्थान हे भारतातलं सर्वात शाकाहारी राज्य आहे. इथं तब्बल 74.9% लोक शुद्ध शाकाहारी आहेत. याचा अर्थ असा की, इथले बहुतांश लोक ना मांस खातात, ना मासे, आणि ना अंडी.
advertisement
राजस्थानी आहारात मुख्यतः डाळ, बाजरीची भाकरी, तूप, दूध, लोणी, भात, आणि भाज्या यांचा समावेश असतो. धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांमुळेही इथल्या अनेक घरांमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे.
नागालँड – 99% लोक मांसाहारी
दुसरीकडे, यासगळ्याच्या विपरीत भारतातलं एक राज्य असंही आहे जिथं शाकाहारी लोकांची संख्या एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. म्हणजेज इथले जवळ-जवळ सगळेच लोक मांसाहार करतात आणि ते म्हणजे नागालँड.
इथं जवळपास 99% लोक मांसाहारी आहेत. मासे, कोंबडी, डुकराचं मांस, आणि इतर नॉनव्हेज पदार्थ हे इथल्या रोजच्या आहाराचा भाग आहेत. नागालँडमध्ये अनेक पारंपरिक पदार्थ हे मांसाहारीच असतात.
भारत ही विविधता असलेली भूमी आहे. इथं एकीकडे शुद्ध शाकाहारी संस्कृती असलेले राज्य आहे, तर दुसरीकडे पारंपरिक मांसाहारी आहार असलेलं राज्यदेखील. त्यामुळे भारतातील आहार संस्कृती ही केवळ चव नव्हे, तर विचार, परंपरा आणि जीवनशैलीचं दर्शन घडवतं.