उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील ही घटना आहे. महिलेचा नवरा काही दिवसांसाठी काही कामासाठी घराबाहेर गेला होता. ती तिच्या खोलीत एकटीच होती. पण मध्यरात्री तिच्या खोलीतून आवाज येऊ लागला. हा आवाज कसला, कुणाचा म्हणून पाहण्यासाठी दिराने डोकावून पाहिलं. धाडस करत तो वहिनीच्या खोलीतही शिरला. त्याला असं दृश्य दिसलं की त्याला धक्काच बसला. तो मोठमोठ्याने ओरडू लागला.
advertisement
मेडिकलला ती गोळी आणायला गेला नवरा, बायकोला न सांगता करायचा विचार केला, मोबाईल पेमेंटने बिघडवला खेळ
महिलेच्या दिराने सांगितलं की, रात्री जाग आल्यावर त्याने पाहिलं की एक पुरूष खोलीत घुसला आहे. त्याने तिथं जाऊन पाहिलं तर वहिनी झोपली होती, तो पुरुष तिथंच होता. त्या पुरुषाला पाहताच दिराने अलार्म वाजवला तसा तो पुरुष बाहेर पळाला.
महिलेचा दीर ओरडू लागल्याने त्या पुरुषाने तिथून पळ काढला. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. पण तो पळून जाऊ शकला नाही, उलट त्याची हाडं मोडली. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्याचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला आणि त्याचं कंबरडंही मोडलं. तो पडताच तो वेदनेने ओरडू लागला. यानंतर आवाज ऐकून लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्याला रुग्णालयात नेलं.
महिलेने तिच्या कुटुंबीयांसह त्या पुरुषाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचं म्हणणं आहे की तिचा पती कामावर बाहेर गेला आहे. ती घराच्या दुसऱ्या मजल्यावर तिच्या मुलांसह राहते. 18 ऑगस्टच्या रात्री गावातील दुसऱ्या समाजातील एका तरुणाने महिलेच्या खोलीत प्रवेश केल्याचा आरोप आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ती व्यक्ती तिथं काय करण्यासाठी गेली होती याचा तपास पोलीस करत आहेत. माहिती मिळाल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केलं जाईल.