झेडी विल असं या तरुणाचं नाव. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहणारा 22 वर्षांचा झेडी एक संगीतकार आहे. त्याच्या पाच गर्लफ्रेंड आहेत. या पाचही जणी त्याच्यापासून एकाच वेळी प्रेग्नंट झाल्या. त्यांचं बेबी शॉवर एकत्र आयोजित केल्याची माहिती जेड्डीची पार्टनर लिझी अॅशलेघनं दिली. टिकटॉकवर तिनं ही माहिती दिली. तिनं आपल्या सोशल मीडियावर बेबी शॉवरचं आमंत्रणही शेअर केले होते. ज्यात 14 जानेवारीला क्वीन्समध्ये पार्टी आयोजित केल्याचं म्हटलं आहे. जेडीनं या निमंत्रण पत्रिकेत आपल्या प्रेग्नंट गर्लफ्रेंडसोबतचा फोटोही दिला होता. ज्यामध्ये वेलकम लिटल जेडी विल्स 1-5 असं लिहिलं होतं.
advertisement
अजब प्रकरण! बायकोनं गायलं गाणं आणि नवऱ्यानं वाजवली गिटार; जन्माला आलं बाळ
अमेरिकन टीव्ही चॅनल टीएलसीवरील बहुपत्नीक कुटुंबाच्या जीवनावर आधारित शोचा संदर्भ देत, अॅशलेने या व्हिडिओसह लिहिले, 'मला वाटतं की आम्ही आता सिस्टर वाईव्स आहोत. अॅशलेघ ने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात पाच महिलांचा उल्लेख केला आहे - अॅशले, बोनी बी, के मेरी, जेलीन व्हिया आणि इयानला कालिफा गॅलेटी - यांनी "एकमेकांना स्वीकारलं कारण ते लहान मुलांसाठी योग्य आहे. एका मोठ्या कुटुंबात वाढतील. आणखी एक फोटो शेअर करत तिनं लिहिलं, 'आमच्या सुंदर कुटुंबाकडे पहा! आम्ही आमच्या बाळाच्या वडिलांवर प्रेम करतो! आम्ही आमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही! आमच्या कुटुंबानं ते स्वीकारलं आहे!'
4 हजार कोटींचा राजवाडा, 700 हून अधिक गाड्या; जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाबद्दल तुम्हाला माहितीय का?
बेबी शॉवरच्या व्हिडिओमध्ये पाचही गर्लफ्रेंड एकत्र नाचताना, खाताना आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
मात्र नेटिझिन्स यावर संताप व्यक्त केला आहे. हे लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया बहुतेक युझर्सनी दिली आहे.