काही प्राण्यांची बुद्धी एवढी तीक्ष्ण असते की ते मानवानं केलेली अवघड कामे सहज करू शकतात. आता ऑरंगुटान पाहा, माणसांप्रमाणेच गोल्फ कार्ट चालवत आहे. तेही अगदी आरामात. ऑरंगुटान प्राण्याचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ओरंगुटान गोल्फ कार्ट चालवताना दिसत आहे. त्याचे ड्रायव्हिंगचे कौशल्य पाहून तो प्राणी आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. गोल्फ कार्ट चालवण्याच्या ओरंगुटानच्या कौशल्याने प्रत्येकजण प्रभावित झाला आहे. हा व्हिडिओ दुबईचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
बर्फ आवडीनं खात असाल तर हा VIDEO बघाच; पुन्हा हातही लावणार नाही
UAE चे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतौम यांची मुलगी, शेखा फातिमा रशीद अल मकतूमचे दुबईत प्राणीसंग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयात इतर प्राण्यांसोबत ओरंगुटानही ठेवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये दिसणार्या ओरंगुटानचे नाव रॅम्बो आहे. रॅम्बो गोल्फ कार्टसह विविध लहान वाहने चालविण्यात पटाईत आहे. रॅम्बो लहानपणापासूनच वेगवेगळी वाहने चालवत आहे. तसे, रॅम्बोचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे रॅम्बो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
प्रत्येकजण रॅम्बोचं कौतुक करत आहे. @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1. 59 मिनिटांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आला आहे.
