अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 2019 ते 2022 या काळात उघडकीस आलेल्या या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे.
नियमांचा केला गैरवापर
जंगल परिसरात साप चावणे ही एक बाब मानली जाते आणि अशा पीडितांना सरकारकडून 4 लाख रुपयांची भरपाई दिली जाते. घोटाळेबाजांनी याच शासकीय नियमाचा गैरवापर केला. जबलपूर विभागाचे बजेट आणि अकाऊंट्स विभागाचे संयुक्त संचालक रोहित सिंग कौशल यांनी पीटीआयला सांगितले की, अधिकाऱ्यांच्या संगनमताने साप चावल्याने मृत्यू झालेल्या पीडितांना भरपाई देण्यासाठी तिजोरीतून पैसे काढण्यासाठी 279 काल्पनिक नावांचा वापर करण्यात आला. त्यांनी पुढे सांगितले की, मृत्यू प्रमाणपत्रे, पोलीस पडताळणी अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल तपासल्याशिवायच रक्कम मंजूर करण्यात आली होती.
advertisement
भारताच्या या शेजारी देशात एकही नदी नाही; तर दुसऱ्या शेजारी देशात 700 नद्या
सचिन दहयात नावाचा सहाय्यक श्रेणी-3 कर्मचारी या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने इतर अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरकारच्या इंटिग्रेटेड फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिममध्ये (IFMS) फेरफार करून पैसे काढल्याचा आरोप आहे.
कौशल म्हणाले, आमच्या तपासात असे आढळून आले की, कागदोपत्री 'मृत' (साप चावल्याने) घोषित केलेल्या व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत होत्या. तसेच मृत व्यक्तींच्या यादीत अनेक काल्पनिक नावे होती.
केओळारी पोलीस ठाण्याचे प्रभारी एस. एस. राम टेक्कर यांनी सांगितले की, एकूण 11.26 कोटी रुपये 46 खात्यांमध्ये फसवणुकीने हस्तांतरित करण्यात आले होते आणि या प्रकरणी 21 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सचिन दहयात आधीच ताब्यात असून, आणखी 25 संशयितांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी पीटीआयला सांगितले.
एकाच व्यक्तीच्या नावाने अनेक मृत्यू प्रमाणपत्रे
काही प्रकरणांमध्ये, एकाच व्यक्तीच्या नावाने अनेक मृत्यू प्रमाणपत्रे जारी करून भरपाईचा दावा केल्याचे कौशल यांनी सांगितले. संत कुमार बघेल या व्यक्तीला साप चावल्याने मृत घोषित करण्यात आले होते. नोंदीनुसार, त्यांच्या 'मृत्यूनंतर' अनेक लाख रुपयांची भरपाई दिली गेली होती. परंतु पीटीआयच्या चमूला ते सिवनी जिल्ह्यातील मालारी गावात जिवंत आणि सुखरूप आढळून आले.
एका वादामुळे संपूर्ण टेक इंडस्ट्री हादरली, बेंगळूरुतील कंपनीचे पुण्याला स्थलांतर
बघेल यांनी पीटीआयला सांगितले की, केओळारी तहसीलमध्ये असा घोटाळा सुरू असल्याचे मी ऐकले होते. आता तुम्ही येथे आल्याने मला कळले की मला मृत घोषित करून माझ्या नावावर पैसे काढले गेले आहेत. पण मला काहीही झालेले नाही. ते पुढे म्हणाले, सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.
बघेलच्या कुटुंबीयांनाही त्याच्या नावाने कोणीतरी भरपाईचा दावा केला हे ऐकून धक्का बसला. संत कुमारचे काका दुर्वेन सिंग बघेल म्हणाले, होय, तो येथेच राहतो. तो माझा पुतण्या आहे. आणि त्याला साप चावून मृत्यू झालेला नाही. तो जिवंत आहे आणि त्याचे सध्याचे वय 75 आहे.
अस्तित्वात नसलेल्या 'द्वारका बाई' च्या नावाने 28 वेळा पैसे काढले
बघेल हे प्रत्यक्षात अस्तित्वात असतानाही त्यांना अधिकृत नोंदींमध्ये मृत घोषित करण्यात आले होते. याउलट 'बिछुआ रैयात गावातील रहिवासी द्वारका बाई' ही व्यक्ती कधी अस्तित्वातच नव्हती. तरीही तिच्या नावाने अनेक मृत्यू प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, तिच्या नावावर 28 वेळा 4 लाख रुपये काढण्यात आले. बिछुआ रैयात येथील केशूराम गजल (59) यांनी पीटीआयला सांगितले, या गावात त्या नावाच्या कोणतीही महिला नाही. तसेच त्या महिलेला साप चावल्याचा कोणताही अहवाल नाही... ती इथे राहतच नसेल. तर आम्हाला तिच्याबद्दल कसे कळेल? ते पुढे म्हणाले, तुम्हीच मला पहिल्यांदा या नावाच्या महिलेबद्दल सांगत आहात.
अराजकतेची भविष्यवाणी खरी होतेय, जगाची धाकधूक वाढली; पुस्तकातील एक-एक शब्द खरा
सरपंच अर्जुन राय यांनीही याला दुजोरा दिला. या नावाची कोणतीही महिला येथे नाही... साप चावल्याची अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्याचप्रमाणे, 'श्री राम' आणि 'राम प्रसाद' यांच्या नावानेही बनावट मृत्यू प्रमाणपत्रे जारी करण्यात आली होती. सुकतारा गावातील 'विष्णू प्रसाद' यांचा साप चावल्याने मृत्यू झाला आणि अधिकृत नोंदीनुसार भरपाई दिली गेली. परंतु स्थानिक ग्रामस्थांनी अशा कोणत्याही व्यक्तीबद्दल कधीही ऐकले नाही.
स्थानिक रहिवासी प्रीतम सिंग म्हणाले, आमच्या ग्रामपंचायत क्षेत्रात साप चावून मृत्यू झालेला विष्णू प्रसाद नावाचा कोणीही नाही. ते पुढे म्हणाले, हा एक घोटाळा आहे. गेल्या चार वर्षांपासून आम्ही माध्यमांद्वारे ऐकत आहोत की आमच्या केओळारी तहसीलमध्ये एक मोठा घोटाळा सुरू आहे.
