एका वादामुळे संपूर्ण टेक इंडस्ट्री हादरली, बेंगळूरुतील कंपनीचे पुण्याला स्थलांतर; कारण ऐकून थक्क व्हाल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
बेंगळूरुमधील भाषिक तणावामुळे कौशिक मुखर्जी यांनी आपली टेक कंपनी पुण्याला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्नड न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील दबावामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.
बेंगळूरु: बेंगळूरुमध्ये सुरू असलेल्या भाषिक तणावामुळे शहरातील एका टेक कंपनीच्या संस्थापकाने आपले कार्यालय सहा महिन्यांत बंद करून पुण्याला स्थलांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कन्नड न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील वाढत्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीचे संस्थापक कौशिक मुखर्जी यांनी सांगितले की, भाषिक मूर्खपणा (language nonsense) मुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. कन्नड न बोलणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना बेंगळूरुमधील सध्याच्या भाषिक वातावरणाचा बळी होऊ द्यायचे नाही, असे ते म्हणाले. हा स्थलांतराचा विचार त्यांच्या कर्मचाऱ्यांनीच मांडला होता आणि त्यांच्या चिंतांना मुखर्जी यांनी पाठिंबा दिला.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
या घोषणेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युझर्सनी पुण्यामध्येही अशाच समस्या येऊ शकतात, असा इशारा दिला आहे. पुण्यात तुमच्या कर्मचाऱ्यांना मराठी न बोलल्यास मनसेकडून मारहाण होण्याची शक्यता आहे, अशी टिप्पणी एका युझरने केली.
advertisement
भारताच्या या शेजारी देशात एकही नदी नाही; तर दुसऱ्या शेजारी देशात 700 नद्या
काहींनी गांधीनगर किंवा नोएडासारख्या शहरांची शिफारस केली, जिथे भाषेची कोणालाही पर्वा नाही. अनेक युझर्सनी व्यंगात्मकपणे या निर्णयाचे कौतुक केले. हा एक चांगला निर्णय आहे. सुटका झाली. आमच्या प्रिय शहराला गर्दीमुक्त करण्यात मदत केल्याबद्दल धन्यवाद, असे एकाने म्हटले. तर दुसऱ्याने पुण्यात स्थलांतरित होत असताना तुमच्या अमराठी कर्मचाऱ्यांना मराठी शिकायला सांगा, असा सल्ला दिला.
advertisement
ताज्या भाषिक वादाचे कारण
नुकताच बेंगळूरुमध्ये एका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) व्यवस्थापकाने एका ग्राहकाशी कन्नडमध्ये बोलण्यास नकार दिल्यानंतर नवीन भाषिक वाद निर्माण झाला होता. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप उसळला. कारण त्यांनी या नकाराला प्रादेशिक भाषा आणि संस्कृतीचा अनादर मानले. सोशल मीडियावर हा मुद्दा लगेचच व्हायरल झाला आणि अनेकांनी राज्याच्या भाषिक संवेदनशीलतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
advertisement
पाकचा नीचपणा, विमानाला Airspace नाकारली; पायलटच्या निर्णयाने 227 जण जीवंत परतले
view commentsबेंगळूरुसारख्या तंत्रज्ञान केंद्रात भाषिक विविधता ही सामान्य बाब आहे. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या भाषिक स्वातंत्र्यासाठी घेतलेला हा निर्णय इतर कंपन्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण करू शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 24, 2025 12:16 AM IST
मराठी बातम्या/Viral/
एका वादामुळे संपूर्ण टेक इंडस्ट्री हादरली, बेंगळूरुतील कंपनीचे पुण्याला स्थलांतर; कारण ऐकून थक्क व्हाल


