व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इमारतीच्या वर टेरेसवर उभा असलेला दिसक आहे. तो फोनवर बोलताना दिसतो. अचानक तो खाली उडी मारतो. खाली उडी मारल्यानंतर, तो छताला पकडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला ते धरता येत नाही आणि तो पार्किंगमधील गाड्यावर थेट खाली पडतो. हे दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहतो.
advertisement
आईनं आपल्याच 2 मुलांना संपवलं, पश्चातापही नाही; धक्कादायक कारण आलं समोर
@1000waystod1e नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 9 सेकंदांचा हा व्हिडीओ हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहेत. ही व्यक्ती उडी मारण्यापूर्वी फोनवर बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्यक्तीने इमारतीवरून ज्या पद्धतीने उडी मारली आहे, त्यामुळे या व्यक्तीच्या जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आत्महत्येचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अनेक घटनांमध्ये आजूबाजूचे लोक किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांचे प्राण वाचवले, तर अनेक घटनांमध्ये लोकांना जीव गमवावा लागला.
