ऑस्ट्रेलियातील ही घटना. टास्मानियातील जॉर्जटाऊन विमानतळापासून सुरू होते. दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी एका खासगी विमानाचं उड्डाण झालं. 72 वर्षीय ग्रेगरी वॉन, त्यांची 66 वर्षांची बायको किम वॉर्नर, त्यांचा प्रिय कुत्रा मॉली या विमानात होते. ग्रेगरीने हे छोटं प्रवासी विमान फक्त चार महिन्यांपूर्वी खरेदी केलं होतं.
विमानाचे पहिलं डेस्टिनेशन व्हिक्टोरिया होतं, इथं थोडा वेळ थांबल्यानंतर त्यांना न्यू साउथ वेल्समधील हिल्स्टन विमानतळावर जायचं होतं. बास स्ट्रेटच्या विशाल समुद्रावरून या विमानाला त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचायचं होतं. पण ते तिथं आलंच नाही.
advertisement
Airhostess : टेकऑफ आणि लँडिगवेळी एअर हॉस्टेस स्वतःच्या मांडीखाली टाकतात हात, पण का?
पण संध्याकाळपर्यंत विमानाची कोणतीही बातमी आली नाही. जेव्हा कुटुंब आणि मित्रांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोणतीही बातमी मिळाली नाही, तेव्हा सर्वांना चिंता वाटू लागली. कुटुंबाने ताबडतोब विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
ऑस्ट्रेलियन मेरीटाईम सेफ्टी अथॉरिटी (AMSA) ने ताबडतोब विमानाच्या शोधात शोध मोहीम सुरू केली. पोलिस बोटी, हेलिकॉप्टर आणि फेरी उत्तर तस्मानिया, बास स्ट्रेट आणि दक्षिण व्हिक्टोरियाच्या भागात विमानाचा शोध घेत आहेत. अद्याप कोणताही अवशेष किंवा कोणताही सुगावा सापडलेला नाही
जॉर्जटाऊनचे फ्लाइट इन्स्ट्रक्टर यूजीन रीड यांच्या मते, लहान विमानांना किनाऱ्यावरून जाण्यापूर्वी हवाई सेवांना माहिती देणं बंधनकारक आहे. पण ग्रेगरीने तसं केलं नाही. जॉर्जटाऊनमध्ये प्रत्येक लहान विमानावर लक्ष ठेवलं जात नाही. जर कोणी विमान त्याच्या हँगरमधून बाहेर काढून उडून गेलं तर ते शोधणं कठीण होतं. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विमानातून कोणताही आपत्कालीन सिग्नल आलेला नाही. जर अपघात झाला असता, तर आपत्कालीन उपग्रह बीकन सक्रिय करायला हवा होता, परंतु तो शांत देखील असतो.
अरे बापरे! 12000 फूट उंचावर जाताच अचानक विमानाचा पंखच तुटला, 62 प्रवासी... धडकी भरवणारा VIDEO
टास्मानियाचे पोलीस निरीक्षक निक क्लार्क यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की, ग्रेगरी हा एक अनुभवी पायलट होता. तो स्थानिक फ्लाइंग क्लबचा एक प्रमुख सदस्य होता आणि त्याला उड्डाणाचा दीर्घ अनुभव होता. पण त्याचं प्रवासी विमान नवीन होतं. त्यात काही तांत्रिक बिघाड होता का? की दुसरं काही गूढ होतं, जे बेपत्ता होण्याचं कारण बनलं? त्याच वेळी हे गूढ दिवसेंदिवस अधिकच गहन होत चाललं आहे. हे विमान जमिनीने खाल्लं आहे की आकाशाने गिळंकृत केलं आहे हे कोणालाही समजू शकत नाही.