अरे बापरे! 12000 फूट उंचावर जाताच अचानक विमानाचा पंखच तुटला, 62 प्रवासी... धडकी भरवणारा VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
Plane Wing Broken : खिडकीच्या सीटवर बसलेल्या एका महिला प्रवाशाचं लक्ष विमानाच्या पंखावर पडलं. विमानाचा पंख तुटला होता. तिने याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला.
नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघातानंतर कित्येकांना तर विमानाने प्रवास करायचीही भीती वाटत असेल. अशात आता विमान दुर्घटनेचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून सगळ्यांना धडकी भरली आहे. विमान हवेत असताना अचानक विमानाचा पंख तुटला आहे.
अमेरिकेतील ही घटना आहे. डेल्टा एअरलाइन्स कंपनीचं हे विमान. फ्लाइट 1893 बोईंग 737 हे विमान ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम इंटरनॅशनल एअरपोर्टला जात होतं. विमानात 12 हजार फूट उंचीवर होतं. त्यावेळी खिडकीच्या सीटवर बसलेल्या एका महिला प्रवाशाचं लक्ष विमानाच्या पंखावर पडलं. विमानाचा पंख तुटला होता.
मीडिया रिपोर्टनुसार शॅनिला आरिफ नावाच्या प्रवासी 19 ऑगस्ट रोजी ऑर्लँडोहून ऑस्टिनला गेली होती. त्यावेळी तिने हा व्हिडीओ बनवला. आरिफ म्हणाला, उड्डाण दरम्यान विमान सुमारे 12000 फूट उंचीवर होतं. तेव्हा आम्हाला दिसलं की पंखाचा एक भाग तुटला होता आणि तो स्पष्टपणे वेगळा झाला होता.
advertisement
विमानातील इतर प्रवाशांना हे कळलं तेव्हा संपूर्ण विमानात एकच खळबळ उडाली. चिंताजनक बाब म्हणजे या विमानात 62 प्रवासी होते आणि सहा क्रू मेंबर्स होते. सुदैवाने विमान ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले, त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. विमान उतरल्यानंतर तपासणी केली असता, डाव्या विंगचा वारा फ्लॅप त्याच्या जागेपासून पूर्णपणे वेगळा झाल्याचं आढळून आलं.
advertisement
#FirstpostAmerica: A Delta Air Lines Boeing 737 flight from Orlando to Austin experienced a mid-air scare when a portion of the left wing's flap broke off before landing in Texas.@EKH2016 tells you more. pic.twitter.com/FSsykG5eSG
— Firstpost (@firstpost) August 21, 2025
advertisement
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानाचा डावा पंख तुटल्याची पुष्टीही एजन्सीने केली. डेल्टाने देखील एक निवेदन जारी करून विमान सुरक्षितपणे उतरले आणि तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात आलं याची पुष्टी केली.
advertisement
या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा विमानाच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं, सर्व विमान कंपन्यांनी विमानांच्या देखभालीमध्ये सुधारणा करण्याची वेळ आली आहे.
Location :
Delhi
First Published :
August 23, 2025 9:37 AM IST
मराठी बातम्या/Viral/
अरे बापरे! 12000 फूट उंचावर जाताच अचानक विमानाचा पंखच तुटला, 62 प्रवासी... धडकी भरवणारा VIDEO