TRENDING:

Best Handwriting In The World: जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर; अक्षरे जणू मोत्यासारखे, 100 टक्के लोकांना वाटते कॉम्प्युटर टायपिंग

Last Updated:

Best Handwriting In The World: आजच्या डिजिटल युगात प्रकृती मल्लाच्या अप्रतिम हस्ताक्षराने जगभरातील लोकांना पुन्हा एकदा हाताने लिहिण्याची कला जपावी असे वाटू लागले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: 'सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना',  हा सुविचार शाळेत प्रत्येकाने वाचला असेल. हस्ताक्षर चांगले हवे म्हणून प्रत्येकाला शिक्षक आणि आई वडिलांकडून ऐकावे लागले असेल. कधीकाळी हस्ताक्षर ही एक कला होती. मात्र मोबाईल आणि कंम्पुटरमुळे हाताने लिहिणे कमी झाले.पूर्वी सुंदर हस्ताक्षराला सौंदर्याला मोठे महत्त्व होते. सुंदर हस्ताक्षराच्या स्पर्धा देखील घेतल्या जात.आजकाल फारच कमी लोकांचे हस्ताक्षर सुंदर असते. आज आम्ही तुम्हाला असे हस्ताक्षर दाखवणार आहोत, ज्याला संपूर्ण जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षराचा सन्मान मिळाला आहे.
News18
News18
advertisement

हस्ताक्षर आणि शिक्षणाचा संबंध

हाताने लिहिणे आणि शिक्षण यांचे फार महत्त्व आहे. चांगले हस्ताक्षर हा शिक्षणाचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. सुंदर हस्ताक्षर विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात यशस्वी होण्यासाठी मदत करते. त्यामुळेच शिक्षकही विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षराची प्रशंसा करतात, कारण ही एक प्रकारची प्रतिभा असते.

या सहा राज्यातील लोक मराठीवर मातृभाषे इतका लावतात जीव, ऊर अभिमानाने भरून येईल

advertisement

नियमित सरावाने सुधारणा

कुठलेही कौशल्य विकसित करण्यासाठी नियमित सराव गरजेचा असतो. म्हणूनच मुलांनी दररोज १५-२० मिनिटे हस्ताक्षराचा सराव केला पाहिजे. यामुळे ते कंटाळणार नाहीत आणि त्यांच्या लिखाणात हळूहळू सुधारणा दिसून येते

प्रकृती मल्ला: जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर

नेपाळची प्रकृती मल्ला हिने आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने संपूर्ण जगाचे मन जिंकले आहे. तिच्या असामान्य लिखाणामुळे तिला जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर असण्याचा सन्मान मिळाला आहे. केवळ १६ वर्षांची असताना ती लोकप्रिय झाली. आठवीत असताना तिने लिहिलेला एक असाइनमेंट इंटरनेटवर व्हायरल झाला. तिचे अक्षर एवढे प्रभावी होते की जगभरातून त्याचे कौतुक झाले.

advertisement

महिला बँकेत पैसे काढण्यासाठी आली, चेकमधील तपशील वाचून कॅशियरला घाम फुटला

संयुक्त अरब अमीरातला लिहिलेल्या पत्रामुळे प्रसिद्धी

प्रकृती मल्लाने संयुक्त अरब अमीरातच्या ५१व्या 'स्पिरिट ऑफ द युनियन' दिनानिमित्त तेथील नेतृत्व आणि नागरिकांसाठी अभिनंदन पत्र लिहिले. तिने स्वतः हे पत्र दूतावासाला दिले. तिच्या सुंदर लिखाणामुळे तिला नेपाळी सशस्त्र दलाकडूनही सन्मानित करण्यात आले. तिच्या हस्ताक्षराचे सौंदर्य पाहून लोक थक्क होतात आणि मंत्रमुग्ध होऊन ते पाहत राहतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलिसांची ट्रॅफिकक्युअर प्रणाली काय? Video
सर्व पहा

आजही जरी डीजिटल युग असले तरी प्रकृती मल्लाच्या अप्रतिम हस्ताक्षराने जगभरातील लोकांना पुन्हा एकदा हाताने लिहिण्याची कला जपावी असे वाटू लागले आहे.

मराठी बातम्या/Viral/
Best Handwriting In The World: जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर; अक्षरे जणू मोत्यासारखे, 100 टक्के लोकांना वाटते कॉम्प्युटर टायपिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल