कांदिवली येथील बीएमसी संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सामान्य रुग्णालयातील ही घटना. मंगळवारी रात्री एका महिलेची डिलीव्हरी झाली. तिने एका बाळाला जन्म दिला. बाळाची एक झलक पाहण्यासाठी ती उत्सुक होती. पण तिने अशा विचित्र बाळाला जन्म दिला. ज्याला पाहून सगळ्यांना धक्का बसला.
आश्चर्यम! एकाच हॉस्पिटलमध्ये प्रेग्नन्सी वॉर्डमध्ये काम करणाऱ्या 14 नर्स एकत्र प्रेग्नंट
advertisement
या बाळाला गुरुवारी सायन येथील बीएमसीच्या सुपर-स्पेशालिटी एलटीएमजी रुग्णालयात हलवण्यात आलं आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. ते व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत, त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच कोणताही निर्णय घेता येईल, असे एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितलं.
आता हे बाळ नक्की होतं कसं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे सयामी जुळं बाळ. म्हणजे म्हणायला दोन बाळ पण असतं एक. या महिलेच्या प्रकरणात दोन डोकं पण एक धड आहे. जोडलेल्या जुळ्या बाळांना जन्म देणं दुर्मिळ आहे. 50000 पैकी 1 किंवा 1 लाख जन्मांमध्ये असं घडतं.
व्यक्तीने दान केलं रक्त, तपासणीनंतर डॉक्टरही घाबरले, ब्लड बॅग लगेच फेकून दिली
जेव्हा एक सुरुवातीचा गर्भ अंशतः वेगळे होऊन दोन बनतो. तेव्हा जोडलेल्या जुळ्या मुलांचा विकास होतो. डॉक्टर जोडलेल्या जुळ्या बाळांना संलयन बिंदूनुसार वर्गीकृत करतात. छाती (थोराकोपॅगस), पोट (ओम्फॅलोपॅगस), डोके (क्रॅनियोपॅगस). या बाळाची छाती जोडलेली आहे त्याुळे ते थोरॅकोपॅगस म्हणून वर्गीकृत केले गेल.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कांदिवली येथील महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की, आई गरोदरपणाच्या प्रगत अवस्थेत होती तरी तिनं त्यांच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी अलीकडेच नोंदणी केली. आम्ही आमच्या रुग्णालयात एक स्कॅन केला आणि आणखी एक खासगी प्रयोगशाळेत केला. मग सयामी जुळ्यांबाबत काही समजलं नाही.