व्यक्तीने दान केलं रक्त, तपासणीनंतर डॉक्टरही घाबरले, ब्लड बॅग लगेच फेकून दिली

Last Updated:

Blood Donation Video : एका रक्तदान शिबिरातील रक्तदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली.

News18
News18
नवी दिल्ली : रक्तदानाला महादान म्हणतात. शेवटी, एखाद्या व्यक्तीने आपल्या शरीरातून रक्त काढून दुसऱ्या व्यक्तीला देणे यापेक्षा मोठे काय असू शकतं? तेही कोणत्याही स्वार्थाशिवाय किंवा पैशाशिवाय. म्हणूनच रक्तदानाला महादान म्हणतात. वेळोवेळी, रुग्णालये किंवा धर्मादाय संस्थांकडून रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात. लोक येथे येऊन रक्तदान करतात. रक्तदान करण्यापूर्वी, व्यक्ती रक्तदान करण्यास योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते. पण यानंतरही अनेक वेळा चुका होतात. अशाच एका रक्तदान शिबिरातील निष्काळजीपणाचं प्रकरण सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं.
या शिबिरात एका तरुणाने येऊन रक्तदान केल्याचं सांगण्यात येत आहे. दान केलेल्या रक्ताची तपासणी केली असता, ती व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आले. सुदैवाने दुसऱ्या रुग्णाला रक्त देण्यापूर्वी रक्ताची तपासणी करण्यात आली. जर हे रक्त एखाद्या निष्पाप व्यक्तीला दिले गेलं असतं तर त्या व्यक्तीचा जीव धोक्यात आला असता.
advertisement
जेव्हा रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं तेव्हा रक्तदान करणाऱ्या व्यक्तीची तपासणी केली जाते. त्याचा रक्तगट, त्याचा रक्तदाब, सर्वकाही मोजलं जाते. पण इथं चाचणीची सुविधा नसल्याने, त्या तरुणाने आरामात रक्तदान केलं आणि तिथून निघून गेला. नंतर रुग्णाला रक्त देण्यापूर्वी रक्त तपासणी केली असता, त्या व्यक्तीला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आलं आणि एकच खळबळ उडाली.
advertisement














View this post on Instagram
























A post shared by Drvlogs (@vloguniversal)



advertisement
यानंतर रक्ताचे पॅकेट ताबडतोब वेगळे करण्यात आले. नंतर त्यावर स्टिकर्स लावून रक्तफेकून देण्यात आलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. पण कोणतंही रुग्णालय रक्त  देण्यापूर्वी त्या व्यक्तीची निश्चितच तपासणी करते. संक्रमित रक्ताचा वापर केला जातो अशी फारच कमी प्रकरणं आहेत. तेही बऱ्याचदा निष्काळजीपणामुळे घडते.
advertisement
व्हायरल होणारा रक्तदानाचा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. न्यूज18मराठी याची खातरजमा करत नाही. @vloguniversal इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
व्यक्तीने दान केलं रक्त, तपासणीनंतर डॉक्टरही घाबरले, ब्लड बॅग लगेच फेकून दिली
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement