मे 2025 पासून 'कॅशलेस ट्रीटमेंट स्कीम' लागू
रस्ते अपघात झाल्यास रुग्णांना तात्काळ आणि खर्चमुक्त उपचार मिळावेत यासाठी भारत सरकारने ‘कॅशलेस ट्रीटमेंट स्कीम’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचार सरकारकडून पूर्णतः मोफत केला जाईल. एका रुग्णासाठी कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार खर्च सरकारकडून भरला जाईल.
योजनेचे खास वैशिष्ट्ये
advertisement
कोणत्याही प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीची आवश्यकता नाही
कागदोपत्री प्रक्रिया न करता रुग्णास तातडीने उपचार मिळतील
रुग्ण वाहनचालक असो, सहप्रवासी असो किंवा पादचारी असो. अपघात हा रस्त्यावर झाला असेल तर अशा लोकांना याचा लाभ घेता येणार आहे.
केवळ प्राथमिक उपचारच नाही, तर गरजेनुसार ऑपरेशन, तपासण्या, डायग्नोसिस आणि इतर वैद्यकीय सेवा सुद्धा मोफत मिळतील
कुठे मिळेल या योजनेचा लाभ?
या योजनेचा लाभ सरकारकडून निवडलेल्या खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्येच मिळणार आहे. यासाठी संपूर्ण देशभरात विविध खासगी रुग्णालयांची निवड केली जात आहे. उद्देश असा की अपघात झाल्यानंतर रुग्णाला जवळच्याच रुग्णालयात तातडीने दाखल करता यावं आणि त्याचा जीव वाचवता यावा.
ही योजना अपघातग्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्याने अनेक जीव वाचू शकतात. सरकारच्या या पुढाकारामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचार न मिळाल्याने होणारे मृत्यू मोठ्या प्रमाणावर टाळले जातील, अशी अपेक्षा आहे.