कुत्रे भुंकायला लागले की सामान्यपणे लोक तिथून घाबरून पळत किंवा शांतपणे पुढे जातात. काही लोक सावधगिरी बाळगून आपला मार्गच बदलतात. पण एकाच वेळी 7-8 कुत्र्यांचा समूहच समोर आला तर काय होईल? तुम्ही काय कराल. एका तरुणासमोर अशी परिस्थिती आली. त्यानंतर त्याने जे केलं त्याचा विचारही कुणी केला नव्हता.
OMG! उडणाऱ्या पक्ष्याचं पोट फाडून बाहेर आला मासा, कसं शक्य आहे?
advertisement
व्हिडीओत पाहू शकता रात्रीची वेळ आहे. रस्त्यावर तसं कुणीच दिसत नाही आहे. फक्त एक तरुण आहे. तो एकटाच रस्त्यावर म्हणून काही कुत्री त्याच्या जवळ धावत येतात. त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. मग तरुण शक्कल लढवतो. तो आपल्या पँटचा बेल्ट काढतो आणि तलवार फिरवावी तसा गरागरा फिरवतो. ज्यामुळे कुत्रे दूर पळतात. पण पाठीवरील बॅगमुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडतो तेव्हा कुत्रे त्याच्यावर धावत येतात. पण कसाबसा तो उठतो आणि पुन्हा बेल्ट फिरवतो. यामुळे जवळ आलेले कुत्रे पुन्हा लांब पळतात.
काही वेळाने तिथून एक कार जाते. कारचालक थोडावेळ गाडी थांबवतो. कदाचित तो त्या तरुणाला मदतीसाठी विचारत असावा. पण तेव्हा तिथली कुत्रेही पळालेली अतात.
VIDEO : रात्री रस्त्यावर झोपली व्यक्ती, तिथं आला सिंह, पुढे जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नाही
@gharkekalesh नावाच्या X हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, पुतलीघर परिसरात भटक्या कुत्र्यांचा हल्ला, रस्त्यावरून चालणाऱ्या एका माणसाने बेल्टने स्वतःचं रक्षण केलं. हे दृश्य अमृतसरचं असल्याचं सांगितलं जातं आहे. बरेच लोक हे दृश्य पाहून घाबरले आहेत. त्यांनी या दृश्याला भयानक म्हटलं आहे. जर त्याने बेल्टने स्वतःचं रक्षण केलं नसतं तर कुत्र्यांनी त्याला फाडून टाकलं असतं, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.
तरुणाच्या बेल्ट ट्रिकला लोक खूप पसंत करत आहेत. बऱ्याच युझर्सनी आपण असं कधीच पाहिलं नव्हतं, आयडिया चांगली आहे आता मीसुद्धा बेल्ट घालून बाहेर जाईन, अशाच कमेंट केल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.