OMG! उडणाऱ्या पक्ष्याचं पोट फाडून बाहेर आला मासा, कसं शक्य आहे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Fish out from bird stomach : एका फोटोग्राफरने बगळ्याच्या पोटातून मासा बाहेर आल्याचा अविश्वसनीय क्षण टिपला आहे, जेव्हा पक्षी उडत होता.' हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
नवी दिल्ली : आकाशातून उडत येत उडता उडता समुद्र किंवा नदीतील माशाची शिकार करणारे पक्षी तुम्ही पाहिले असतील. कित्येक पक्षी आकाशातून उडत येतात आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पाण्यातील मासा चोचीत थरून भुर्रकन उडून जातात. असाच एक पक्षी ज्याने माशाची शिकार केली. पण हाच मासा हा पक्षी उडत असताना त्याचं पोट फाडून बाहेर आला.
advertisement
प्रत्येक सजीव एकमेकांचे अन्न आहे. साप उंदरांची शिकार करतात, तर गरुड सापांची शिकार करतात. त्याचप्रमाणे इतर सजीवांनाही इतर सजीव खातात. पण कधीकधी शिकारीही शिकार बनतो. तज्ज्ञ जंगलात जाऊन सजीवांमध्ये संशोधन करतात. असे फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी ते वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करतात, जे अविश्वसनीय वाटतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर विश्वास ठेवणं कोणालाही कठीण जाऊ शकतं.
advertisement
X वर हा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे की एका बगळ्या पक्ष्याने अन्नाच्या शोधात एका ईल माशाची शिकार केली. ईल गिळल्यानंतर तो शेकडो फूट उंचीवर आकाशात उडू लागला. पण नंतर त्याच्यासोबत एक धोकादायक अपघात झाला. मासा बगळ्याचं पोट फाडून बाहेर आला. एका फोटोग्राफरने हे आश्चर्यकारक दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर शेअर केले, जे आता वेगाने व्हायरल होत आहे.
advertisement
या व्हायरल चित्रात तुम्हाला दिसेल की बगळा हवेत उडत आहे, त्यानंतर ईल मासा त्याच्या पोटातून बाहेर पडताना दिसत आहे. अमेझिंग नेचरच्या @AMAZlNGNATURE या एक्स अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. इथं वन्यजीव आणि निसर्गाशी संबंधित इतर गोष्टी अनेकदा शेअर केल्या जातात. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एका फोटोग्राफरने बगळ्याच्या पोटातून मासा बाहेर आल्याचा अविश्वसनीय क्षण टिपला आहे, जेव्हा पक्षी उडत होता.' हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
advertisement
आता बगळा आणि ईलच्या या फोटोवर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक छायाचित्रकाराचे कौतुक करत आहेत, तर काही लोक फोटोच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
A photographer has captured the incredible moment an eel escaped from heron’s stomach while the bird was still in flight. pic.twitter.com/PK5LMVUbF4
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) December 27, 2024
advertisement
एका युझरने विचारलं 'माशाने बगळ्याचं पोट कसं कापलं? दुसऱ्या युझरने विचारलं 'पक्षी मेला की जिवंत राहिला? ... आम्हाला स्पष्टपणे सांगा'. तिसऱ्या युझरनं म्हटलं, या फोटोचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, हे चित्र अद्भुत आहे.' तर चौथा युझर म्हणाला 'ईल माशाने बगळ्याचं पोट फाडलं नाही, हे काही कॅमेरा ट्रिक आणि एडिटिंग असावं'. आता लोक या चित्रावर आपापले युक्तिवाद करत आहेत.
advertisement
Location :
Delhi
First Published :
June 14, 2025 4:20 PM IST