फास्ट फूड रेस्टॉरंट फ्रँचायझी "सबवे" ने खास अटींवर एक उत्तम ऑफर दिली आहे. कंपनीचं नाव बदलण्यासाठी एक स्पर्धा ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धकांना फक्त SubwayNameChange.com जायचंय आणि 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान या वेबसाईटवर लॉगईन करायचंय.
घर चालवण्याचा 13 वर्षांचा अनुभव, हाऊस वाईफचा CV होतोय व्हायरल
advertisement
या स्पर्धेत फक्त सहभाग घेण्यासाठी वय 18 च्या पुढे असावं. ही स्पर्धा फक्त अमेरिकेसाठी मर्यादित आहे. विशेष म्हणजे, नाव बदलण्यासाठी कंपनी विजेत्याला $750 कायदेशीर शुल्क देईल. विजेत्याला $50,000 म्हणजेच 41,13, 000 रु. किमतीची सबवे गिफ्ट कार्ड्स मिळतील ज्याचा वापर आयुष्यभर करु शकता. जिंकलेली व्यक्ती आयुष्यभर सॅंडविच आणि कोल्ड्रिंग्स घेऊन जाऊ शकते.
तुम्ही पण टोमॅटो सॉस खाता का? कारखान्यातून समोर आलेला हा VIDEO बघाच, परत हातही लावणार नाही
जो कोणी स्वतःचं नाव बदलून 'सबवे' ठेवेल त्याला कंपनी ही ऑफर देणार आहे. यासाठी कंपनीनं पुरावाही पाहिल. पुराव्यासाठी नाव बदलणाऱ्या व्यक्तीकडे चार महिन्यांचा कालावधी आहे. जो कोणी अधिकृतपणे आपलं नाव सबवे ठेवेल याचा पुरावा कंपनी चेक करेल आणि ही ऑफर त्याला देईल. म्हणजेच आयुष्यभर सॅंडविच कोल्डिंग फ्री मिळवण्यासाठी लोकांना आपलं नाव बदलावं लागेल.
