जालौनमधील पंडितपूर गावात एका तांत्रिकामुळे खळबळ उडाली आहे. तांत्रिक राजकुमार तिवारीने गावात इतकी दहशत पसरवली आहे की सगळेच चिंतेत आहेत. सुमारे अर्धा डझन मुलं बेशुद्ध आहेत आणि राजकुमार राजकुमार किंचाळत आहे. कुणी ओरडत आहे, तर कुणी रडत आहे. मुलं बेशुद्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली.
advertisement
नेमकं घडलं काय?
मुलांना बरं करण्याच्या नावाखाली तांत्रिकाने हे सर्व केल्याचा आरोप लोक करत आहेत. हा तांत्रिक आपल्या तंत्रविद्येने लोकांना बरं करतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे आजूबाजूच्या गावातून अनेक लोक त्याच्याकडे उपचारासाठी येतात. यावेळी त्यांच्या ठिकाणी तंत्रविद्येसाठी आलेली मुलं अचानक बेशुद्ध झाली. त्यामुळे गावात खळबळ उडाली.
औषधांचाही परिणाम नाही, डॉक्टरही शॉक
घाबरलेल्या कुटुंबीयांनी मुलांना दवाखान्यात नेलं. मुलांवर उपचार करताना डॉक्टरही चिंतेत दिसले. डॉक्टरांच्या औषधांचा मुलांवर काहीही परिणाम होत नाही. काहींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे मुलांच्या पालकांची चिंता आणखी वाढली आहे. ग्रामस्थांनी आता जिल्हा प्रशासनाकडे तांत्रिकाची सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र गावातील तांत्रिकाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
