दरवर्षी सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर असतो. मात्र, सापांची भीती असूनही लोकांना या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचं असतं. सापांविषयी अनेक तथ्यं आहेत जी अनेकांना माहीत नाहीत. अशीच एक गोष्ट म्हणजे जगात असे काही देश आहेत जिथे सर्पदंशामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. हे विचित्र वाटत असलं तरी सत्य देखील आहे.
advertisement
दिवसभर मोठी गर्दी; पण अंधार पडताच भारतातील या गावातून सगळे काढतात पळ, कारण थरकाप उडवणारं
इथे सर्पदंशाने कोणाचा मृत्यू होत नाही कारण या देशात आजपर्यंत एकही साप दिसला नाही. अशा परिस्थितीत देशात सापच नसल्यामुळे सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत ते म्हणजे आयर्लंड. उत्तर-पश्चिम युरोपमध्ये असलेल्या या देशात साप नाहीत. आजपर्यंत आयर्लंडमध्ये एकही साप दिसला नाही.
आयरिश सरकारच्या जीवाश्म कार्यालयाच्या नोंदींमध्ये असा कोणताही पुरावा नाही की त्या देशात कधीही साप अस्तित्वात होते. तज्ज्ञांच्या मते, आयर्लंडमध्ये साप कधीच अस्तित्वात नव्हते. वैज्ञानिक स्पष्टीकरण असं आहे की सुमारे 10,000 वर्षांपूर्वी हिमयुगात आयर्लंड बर्फाने झाकलेलं होतं. साप हे थंड रक्ताचे प्राणी असले तरी त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची आवश्यक पातळी राखण्यासाठी त्यांना त्यांच्या सभोवतालची उष्णता घ्यावी लागते. बर्फाच्छादित आयर्लंडमध्ये त्यांना हे शक्य नव्हतं. केवळ आयर्लंडमध्येच साप नाहीत, असं नाही. जगात अशी इतरही काही ठिकाणं आहेत जिथे नैसर्गिक आणि भौगोलिक कारणांमुळे साप नाहीत. त्या ठिकाणांची नावं आहेत- आइसलँड, ग्रीनलँड, हवाई, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, रशियाचा भाग आणि कॅनडा.
