दिवसभर मोठी गर्दी; पण अंधार पडताच भारतातील या गावातून सगळे काढतात पळ, कारण थरकाप उडवणारं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
. या गावात दिवसभर मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन गावातून बाहेर पडण्यास वेळ लागतो, अशी परिस्थिती निर्माण होते. पण अंधार पडताच लोक गाव सोडून जातात.
नवी दिल्ली : आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा गावाबद्दल सांगणार आहोत त्याला झपाटलेलं गाव असंही म्हणतात. या गावात दिवसभर मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन गावातून बाहेर पडण्यास वेळ लागतो, अशी परिस्थिती निर्माण होते. पण अंधार पडताच लोक गाव सोडून जातात. हे गाव दक्षिण भारतातील रामेश्वरमपासून 13 किमी अंतरावर आहे. जे अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, जाणून घेऊया या गावाचं रहस्य.
रामेश्वरमचं धनुषकोडी गाव. जे भारतातील शेवटचं गाव आहे. यापासून थोड्याच अंतरावर श्रीलंका सुरू होते. येथे बांधलेला रस्ता समुद्रात संपतो. वेगवान वाहन थेट समुद्रात जाऊ नये यासाठी रस्त्याच्या शेवटच्या टोकाला भिंत बांधण्यात आली आहे. येथे दररोज हजारो पर्यटक येतात. वाहनांमुळे येथे वाहतूक कोंडी होते. खरेदीसाठी बाजारपेठा, खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स आहेत.
हे सर्व आजूबाजूच्या गावातील लोक चालवतात. मात्र रात्र होताच हे गाव ओसाड पडतं. एकही माणूस इथे राहत नाही. सर्व दुकानदार माल घेऊन गावी परततात. या कारणास्तव याला झपाटलेलं गाव म्हटलं जातं. 1964 मध्ये या गावाला भीषण चक्रीवादळाचा फटका बसला. ज्यात रेल्वे स्टेशन, ट्रेन, हॉस्पिटल, चर्च, शाळा, मंदिर, पोस्ट ऑफिस सगळं काही वाहून गेलं. या चक्रीवादळात सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे वाहून गेलेल्या ट्रेनमध्ये प्रवासीही होते.
advertisement
आजपर्यंत ही ट्रेन सापडलेली नाही. रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, पूर्वी रामेश्वरम ते धनुषकोडीपर्यंत गाड्या धावत होत्या. मात्र चक्रीवादळानंतर येथील गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. इथे अनेक लोक मारले गेल्याने गावातील लोक जवळच्या भागात स्थलांतरित झाले आहेत. ते दिवसा इथे येऊन दुकानं चालवतात आणि रात्री परतताय. याशिवाय इथे चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता असते, या दोन कारणांमुळे गावातील लोक रात्री इथे राहत नाहीत. संपूर्ण गाव रिकामं होतं.
advertisement
इथे दुकान चालवणाऱे चेत्रिती सांगतात की, घटनेच्या वेळी तिथे माझे आई-वडील होते, त्यांनी पळून आपला जीव वाचवला. आता दोघांचाही मृत्यू झाला आहे. गावात स्टेशन इमारत, चर्च आणि शाळेचे अवशेष दिसतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2024 10:55 AM IST
मराठी बातम्या/Viral/
दिवसभर मोठी गर्दी; पण अंधार पडताच भारतातील या गावातून सगळे काढतात पळ, कारण थरकाप उडवणारं










