Bangladesh Cricket : बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप, बोर्डाविरोधात खेळाडूंचं बंड, थेट मॅच बहिष्काराचा इशारा!

Last Updated:

बांगलादेश क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संकटाने डोकं वर काढलं आहे. बांगलादेशच्या राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटूंनी सर्व प्रकारच्या क्रिकेटवर अनिश्चित काळासाठी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप, बोर्डाविरोधात खेळाडूंचं बंड, थेट मॅच बहिष्काराचा इशारा!
बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप, बोर्डाविरोधात खेळाडूंचं बंड, थेट मॅच बहिष्काराचा इशारा!
ढाका : बांगलादेश क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संकटाने डोकं वर काढलं आहे. बांगलादेशच्या राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटूंनी सर्व प्रकारच्या क्रिकेटवर अनिश्चित काळासाठी बहिष्कार टाकण्याचा इशारा देत एकमताने निवेदन जारी केले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) संचालक एम. नझमुल इस्लाम यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत कोणताही खेळाडू मैदानात उतरणार नाही, असा इशारा खेळाडूंनी दिला आहे.

अपमानास्पद वक्तव्यांमुळे खेळाडू संतप्त

बुधवारी बीसीबी संचालक एम. नझमुल इस्लाम यांनी माध्यमांमध्ये खेळाडूंबद्दल काही अत्यंत अपमानजनक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केली तेव्हा वाद सुरू झाला. या विधानांमुळे खेळाडूंच्या प्रतिष्ठेला गंभीर धक्का बसला, ज्यामुळे त्यांना हे निर्णायक पाऊल उचलण्यास भाग पाडले. बांगलादेश क्रिकेटर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद मिथुन यांनी नझमुल इस्लाम यांच्या विधानानंतर काही तासांतच बहिष्काराची घोषणा केली.
advertisement

बीपीएल सामन्यांवर संकट

खेळाडूंच्या निर्णयाचा थेट परिणाम बांगलादेश प्रीमियर लीगवर होण्याची शक्यता आहे. लीगचे दोन महत्त्वाचे सामने 15 जानेवारी रोजी होणार आहेत. जर खेळाडूंची भूमिका अशीच राहिली तर हे सामने रद्द होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बोर्ड आणि आयोजकांचे मोठे नुकसान होऊ शकतं.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) ताबडतोब एक प्रेस रिलीज जारी करून हात झटकण्याचा प्रयत्न केला. बोर्डाने नझमुल इस्लाम यांच्या विधानांपासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अनुचित, आक्षेपार्ह किंवा दुखावणाऱ्या विधानांबद्दल बोर्ड तीव्र खेद व्यक्त करते. असे विचार बीसीबीच्या मूल्यांचे, तत्त्वांचे किंवा अधिकृत भूमिका प्रतिबिंबित करत नाहीत, असं बीसीबीने निवेदनात म्हटलं आहे. शिवाय, बोर्डाने स्पष्ट केले की जोपर्यंत अधिकृत प्रवक्त्याने किंवा मीडिया विभागाने निवेदन जारी केले नाही तोपर्यंत ते व्यक्तीचे वैयक्तिक मत मानले पाहिजे.
advertisement
खेळाडूंचा राग शांत करण्यासाठी, बीसीबीने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ज्यांचे वर्तन खेळाडूंचा अनादर करते किंवा क्रिकेटची प्रतिष्ठा खराब करते अशा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध योग्य शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. बोर्डाने पुनरुच्चार केला की खेळाडू बांगलादेश क्रिकेटच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्यांच्या योगदान आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Bangladesh Cricket : बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप, बोर्डाविरोधात खेळाडूंचं बंड, थेट मॅच बहिष्काराचा इशारा!
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement