TRENDING:

'आस्‍तीन के सांप...' असं का म्हणतात, म्हणीचा नेमका अर्थ तुम्हाला माहितीये का?

Last Updated:

हिंदी भाषेत सापांशी संबंधित कितीतरी म्हणी आणि वाक्प्रचार सर्रास वापरले जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: विकास नावाच्या एका मुलाला सात वेळा साप चावल्याच्या बातम्या डिजिटल मीडियावर खूप चालल्या. त्यामुळे सापांशी संबंधित बातम्या आणि चर्चांना ऊत आला आहे. पावसाळ्यात देशाच्या अनेक भागांमध्ये साप निघतात. सर्पदंशाच्या बातम्याही कानावर येतात. अनादी काळापासून साप हा माणसाच्या कुतूहलाचा विषय आहे. त्यांच्याबद्दल कितीही माहिती मिळाली तरी आणखी माहिती जाणून घेण्याबाबत उत्सुकता वाटते. रंग-रुप-आकारासह त्याची वृत्ती हाही त्या कुतूहलाला कारणीभूत आहे. हिंदी भाषेत सापांशी संबंधित कितीतरी म्हणी आणि वाक्प्रचार सर्रास वापरले जातात. उदा. कलेजे पर साँप लोटना, साँप को दूध पिलाना, आस्तीन में साप रखना, साँप सूँघ जाना किंवा साँप भी मर जाए और लाठी भी ना टूटे... असे अनेक वाक्प्रचार हिंदी भाषेत रुढ आहेत.
advertisement

या म्हणी आणि वाक्प्रचार कुठून आले या बाबतच्या गोष्टीही आहेत. सापाला मारु नये असं म्हणतात. लोकांमध्येही हे ज्ञान आहे आणि आधुनिक विज्ञानही हे सांगतं की साप हा पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा जीव आहे. तो शेतकरी बांधवांचा मित्र आहे. उंदरांना खाऊन तो पिकांचं रक्षण करतो. त्यामुळे साँप भी मर जाए और लांठी भी ना टूटे या म्हणीला फक्त म्हण म्हणूनच पहावं, हे बरं. कायद्यानुसार साप आढळल्यास जवळच्या वन विभागाच्या कार्यालयात त्याबाबत माहिती देणं आवश्यक आहे. त्यांचे प्रशिक्षित कर्मचारी येऊन त्याला योग्य प्रकारे पकडून त्याच्या अधिवासात सोडतील. तसं केल्यास सापही वाचेल आणि काठीही!

advertisement

(खरंच 7 वेळा चावला साप? विकासच्या दाव्यावर डॉक्टरांचा रिपोर्ट; धक्कादायक खुलासा)

सापाबाबत 'कलेजे पर साँप लोट गया' अशीही एक म्हण आहे. इतरांची प्रगती बघून प्रचंड इर्षेपोटी ही म्हण वापरली जाते. बोलीभाषेत ती वापरताना 'कलेजे पर' च्या ऐवजी 'दिल पर' असंही म्हटलं जातं. प्रत्यक्षात कुणाच्याही हृदयावर साप लोटण्याची कल्पना करुन पहा, काय अवस्था होईल त्या माणसाची! साप हा असा प्राणी आहे ज्याच्या नुसत्या दिसण्यानेही अनेक जण घाबरुन जातात. अशात तो छातीवर आला किंवा हृदयाला चिकटला तर काय होईल? याची आपण कल्पना करु शकतो. असं असलं तरी काही जण मात्र आपल्या मनात प्रचंड द्वेष आणि तिरस्कार बाळगणारे असतात. त्यांना हिंदीमध्ये 'अस्तीन में साँप छुपाना' असं म्हटलं जातं. कुणी एक मदारी आपल्या अस्तनीत म्हणजे सदऱ्याच्या बाहीत साप बाळगत असे असं म्हटलं जाई. साप त्याला चावतही नसे. त्याचा त्याला अभिमानही होता. सापाला आपण पाळलं आहे, तर तो आपल्याला चावणार नाही असं त्याला वाटत असे. मात्र एकदा मदाऱ्याने केलेल्या कृत्याचा सापाला राग आला आणि तो त्याला चावलाही.

advertisement

अजून एक अशीच म्हण आहे, ती म्हणजे ‘साँप को दूध पिलाना’. खरं तर सापाला दूध पाजणं अयोग्य आहे. सापाला आपल्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्याएवढी समज नसते. त्याचं भलं करणारेही त्याच्या लक्षात राहात नाहीत. सापाची मादी आपल्याला मारणारी व्यक्ती असेल तर तिला लक्षात ठेवते आणि बदला घेते असं म्हटलं जातं, मात्र प्रत्यक्षात याच्या विरुद्ध चित्र असतं. सापाला मेंदू नसतो. माणूस हा त्याचा शत्रू नाही, मात्र त्याला माणसाकडून त्रास झाला तर स्वसंरक्षणार्थ तो माणसाला चावतो. चावला तर त्याचं विष परिणाम करतंच. त्यामुळे तुम्ही सापाला दूध पाजलं तरी तो तुमचे उपकार स्मरणात ठेवून तुम्हाला सोडणार नाही या विचारातून ही म्हण आली आहे. साँप को दूध मत पिलाना म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल फारसं चांगलं मत नाही त्याचं भलं करण्याच्या फंदात पडू नये. तुमच्या माहितीसाठी हे सांगणं आवश्यक आहे, की सापाला दूध पाजणं योग्य नाही. गारुड्याने जबरदस्तीने तसं केलं तर साप आजारी पडू शकतो आणि मरुही शकतो.

advertisement

साप या प्राण्याची अनेकांना भीती वाटते. तो चावला तर माणसाची तब्येत अत्यंत बिघडू शकते. सापाचं नाक त्याच्या तोंडाच्या अगदी जवळ असतं. त्यामुळे तो चावला की त्याने फक्त वास घेतला हे कळत नाही. अशा वेळी घाबरुनच एखाद्याचा जीव अर्धा होतो. त्यामुळे एखाद्याची भीतीने बोलती बंद झाली तर अशा वेळी 'साँप सूँघ गया क्या' असं विचारायची पद्धत आहे. 'भई गति साँप छछूंदर केरी…' असंही हिंदीत अगदी सर्रास म्हटलं जातं. हे रामचरित मानसमधून घेण्यात आलं आहे. साप बिळ करत नाही. तो उंदीर मारुन खातो आणि त्यांच्या बिळात राहतो.

advertisement

सापाने चुकून उंदराऐवजी चिचुंद्रीला पकडलं किंवा खाल्लं असता तो अंध होऊ शकतो असं मानलं जातं. त्यामुळे सापाने चिचुंद्री तोंडात पकडली तर त्याला त्रास होईल आणि सोडून दिली तर तो भूकेला राहील. यालाच मराठीत ‘इकडे आड तिकडे विहीर’ म्हण आहे म्हणून माणसाच्या मनातील द्विधेचं वर्णन करताना संत तुलसीदासांनी रामचरित मानसात हे उदाहरण दिलं असावं. खरं तर वैज्ञानिक दृष्टीने चिचुंद्री हा सापाचा आहार मानला जातो.

प्रादेशिक भाषांमध्येही सापाशी संबंधित अनेक म्हणी आहेत. दिल्ली विद्यापीठाचे प्रा. रामाशंकर कुशवाहा सांगतात, सापाचा स्वभाव आणि माणसाला त्याबद्दल असलेलं कुतूहल हे अशा म्हणींच्या मुळाशी आहे. इतर सर्व प्राणी माणूस पाळू शकतो, मात्र साप पाळणं शक्य नसतं. निसर्गाने त्याला विचारशक्ती दिलेली नाही. त्यामुळे तो माणसाला चावतो. त्यामुळे सापाशी संबंधित सर्व म्हणी या बहुतेक नकारात्मक आहेत, असंही ते स्पष्ट करतात. एनसीईआरटीचे प्रा. प्रमोद दुबेही साप आणि कुतूहल हा मुद्दा अधोरेखित करतात. प्रा. दुबे म्हणतात, काळ किंवा वेळ हा ही सर्पाकार आहे असं मानलं जातं. योगाभ्यासाच्या मते मानवी चेतनेची प्रमुख शक्ती असलेली कुंडलिनीही सर्पिलाकार असते. असे समज त्यांच्याभोवती कुतूहल निर्माण करतात. भारतात नागवंशी राजपूत असतात. इजिप्तमध्येही राजाच्या मुकुटामध्ये सापाची आकृती असते. त्यामुळे सामाजिक व्यवहारात त्यांचा उल्लेख होत राहातो, असंही प्रा. दुबे स्पष्ट करतात.

मराठी बातम्या/Viral/
'आस्‍तीन के सांप...' असं का म्हणतात, म्हणीचा नेमका अर्थ तुम्हाला माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल