खरंच 7 वेळा चावला साप? विकासच्या दाव्यावर डॉक्टरांचा रिपोर्ट; धक्कादायक खुलासा

Last Updated:

जिथं जिथं गेला तिथं तिथं या तरुणाला साप चावला. आता हे कसं शक्य आहे, याच्या तपासासाठी आरोग्य विभागाचं पथक बनवण्यात आलं. याप्रकरणी आता मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिला आहे.

तरुणाला खरंच 7 वेळा सर्पदंश
तरुणाला खरंच 7 वेळा सर्पदंश
लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका तरुणाने आपल्याला 7 वेळा साप चावल्याचा दावा केला, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रशासन हादरलं आहे. जिथं जिथं गेला तिथं तिथं या तरुणाला साप चावला. आता हे कसं शक्य आहे, याच्या तपासासाठी आरोग्य विभागाचं पथक बनवण्यात आलं. याप्रकरणी आता मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिला आहे. ज्यातून धक्कादायक खुलासा झाला आहे.
उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना. फतेहपूर जिल्ह्यातील सौरा गावात राहणारा 24 वर्षांच्या विकास द्विवेदीला 40 दिवसांत 7 वेळा साप चावला. प्रत्येक वेळी उपचारानंतर तो बरा झाला. विकास सांगतो की, सापाने त्याला स्वप्नात सांगितलं होते की, जेव्हा तो त्याला नवव्या वेळी चावेल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. सापाने त्याला आतापर्यंत सात वेळा लक्ष्य केलं आहे.
advertisement
2 जूनपासून सर्पदंश सुरूच
विकासच्या म्हणण्यानुसार, 2 जून रोजी रात्री 9 वाजता बिछान्यातून उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला. त्यानंतर कुटुंबीय त्याला एका खासगी नर्सिंग होममध्ये घेऊन गेले. दोन दिवस तो तिथं दाखल होता. उपचारानंतर तो बरा होऊन घरी आला. ही एक सामान्य घटना असल्याचं कुटुंबीयांना वाटलं. मात्र 10 जूनच्या रात्री पुन्हा सापाने चावा घेतला. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेलं. यावेळीही तो उपचारानंतर बरा झाला. मात्र, त्याला सापाची भीती वाटू लागली आणि त्याने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. मात्र सात दिवसांनंतर 17 जून रोजी पुन्हा घरात सापाने दंश केला. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडू लागली आणि कुटुंबीय घाबरले. मग त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन तो परत बरा झाला.
advertisement
आश्चर्याची बाब म्हणजे चौथ्यांदा सापाने सात दिवसही जाऊ दिले नाहीत. घटनेच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सापाने विकासला चावा घेतला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यावेळीही तो उपचारानंतर बचावला. अशा स्थितीत नातेवाईक आणि डॉक्टरांनी विकासला काही दिवसांसाठी दुसरीकडे पाठवण्याचा सल्ला दिला. सल्ल्यानुसार विकास हा त्याच्या मावशीच्या घरी (राधानगर) राहायला गेला. मात्र, गेल्या शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा मावशीच्या घरातच साप चावला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला त्याच रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
मंदिरात घेतला आसरा
पीडित तरुणाचे काका राधाकृष्ण दुबे यांनी सांगितले की, काल सर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी काही तांत्रिकांनी काही उपाय सांगितले आहेत. त्यांचा पुतण्या विकाससोबत ते चित्रकूटला गेले. रामघाटावर मंदाकिनी नदीत स्नान केल्यानंतर कामनाथ स्वामी आणि हनुमंधरा यांचं दर्शन घेतलं. नंतर मेहंदीपूरला बालाजीचं दर्शन घेतलं आणि पूजा केली. सापाच्या भीतीमुळे विकासने घरापासून 500 किमी अंतरावर असलेल्या मेहंदीपूर बालाजी मंदिरातच आसरा घेतला आहे.
advertisement
खरंच वारंवार चावला साप? तपासात धक्कादायक खुलासा
ही बाब सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर आता जिल्ह्याच्या आरोग्य विभागानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणाचं गूढ उकलण्यासाठी फतेहपूर प्रशासनाने एक समिती स्थापन केली.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, पाच दिवसांच्या तपासणीनंतर विकासच्या अंगावर असलेल्या सात सर्पदंशाच्या खुणांपैकी सहा सर्पदंशाच्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विकासला पहिल्यांदाच साप चावला होता. त्यानंतरचे जे काही सर्पदंश दाखवले जात आहेत, ते संशयास्पद आहेत.
advertisement
सीएमओचं डीएमला पत्र
आता सीएमओ डॉ राजीव नयन गिरी यांनी संपूर्ण प्रकरणाचं सत्य उघड केलं आहे. डीएमला लिहिलेल्या पत्रात गिरी यांनी विकास स्नेक फोबियाने ग्रस्त असल्याचं सांगितलं. डॉ. राजीव नयन गिरी यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'वारंवार साप चावल्याप्रकरणी 12 जुलैपासून समितीने विकास द्विवेदीची चौकशी केली. हा अहवाल 15 जुलै रोजी सादर होत आहे. एवढ्या कमी कालावधीत एखाद्या व्यक्तीला सापाने वारंवार दंश करणं शक्य होत नाही, असा निष्कर्ष तपास समितीच्या निदर्शनास आला. पहिल्यांदाच, त्याला 2 जून 2024 रोजी साप चावला असावा. राम सानेही मेमोरियल हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार देण्यात आले. यानंतर तो सापाच्या फोबियाने ग्रासल्याचं दिसून येतं. त्याला आपल्याला पुन्हा पुन्हा साप चावल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत त्याने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
advertisement
डेप्युटी सीएमओ आरके वर्मा म्हणाले, 'आरोग्य विभागाच्या तीन सदस्यीय पथकाने डॉ. राम सानेही मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली होती. विकासला दिलेल्या उपचाराची फाईल पाहिली. त्यांना 6 वेळा अँटी व्हेनम आणि अँटी बायोटिक औषधं देण्यात आली आहेत. विकास दुबेच्या प्रकरणात आतापर्यंत जे काही समोर आले आहे त्यानुसार त्याला साप फोबिया आहे. विकास सध्या घरी नाही. जेव्हा तो घरी परतेल तेव्हा आम्ही त्याच्या कुटुंबीयांशी बोलू. त्याला हवं असल्यास आम्ही त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेऊ.
मराठी बातम्या/Viral/
खरंच 7 वेळा चावला साप? विकासच्या दाव्यावर डॉक्टरांचा रिपोर्ट; धक्कादायक खुलासा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement