Snake News: घरात आला असा वास तर समजून जा कुठेतरी लपलाय साप; एक्सपर्ट्सने सांगितलं कसं ओळखायचं

Last Updated:

तुमच्या घरात साप आहे की नाही हे तुम्ही वासावरुन सांगू शकाल का? जर तुम्हालाही हे जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

सापाचा वास (प्रतिकात्मक फोटो)
सापाचा वास (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली : मानवी नाक इतकं शक्तिशाली आहे की ते वातावरणातील अगदी थोडा वास देखील सहज ओळखू शकतं. तो वास कशाचा आहे हे मेंदू लगेच सांगतो. पण जिवंत प्राण्यांचा वास तुम्ही ओळखू शकता का? तुमच्या पाळीव कुत्र्याच्या किंवा मांजराच्या वासावरून तुम्ही कदाचित त्यांना ओळखू शकाल, पण तुमच्या घरात साप आहे की नाही हे तुम्ही वासावरुन सांगू शकाल का? जर तुम्हालाही हे जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे..
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Quora वर लोक अनेकदा विविध प्रकारचे प्रश्न विचारतात आणि नंतर इतर लोक त्या प्रश्नांची उत्तरे देतात. काही वर्षांपूर्वी कोणीतरी एक अतिशय विचित्र प्रश्न विचारला - मला आणि माझ्या मुलीला सापाचा वास येतो. माझे पती आणि इतरांना वाटतं की आम्ही वेडे आहोत. इतर कोणालाही सापाचा वास येतो का? अनेकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि सांगितलं की त्यांनाही सापांचा वास येतो. काहींना जास्त तर काहींना कमी येतो. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सापाचा वास कसा असतो?
advertisement
साप त्यांच्या वासावरून ओळखता येतो
ऑगस्ट 2021 मध्ये ‘बेस्ट लाइफ’ वेबसाइटच्या एका अहवालात, एली होगन नावाच्या लेखिकेने सापांचा वास कसा येतो याचा उल्लेख केला आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये, जेव्हा तुम्ही साप पाहाल तेव्हाच तुम्ही तो शोधू शकाल कारण ते खूप हळू पुढे सरकतात आणि त्यांचा वास ओळखणं थोडं कठीण असतं. पण अमेरिकेच्या मिसूरी डिपार्टमेंट ऑफ कॉन्झर्व्हेशन (MDC) ने सांगितलं की, कॉपरहेड सापाचा वास काकडीसारखा असतो. हा वास सापाच्या शेपटीच्या खाली असलेल्या ग्रंथीतून निघतो.
advertisement
फक्त कॉपरहेड सापच नाही तर रॅटल सापाचा वास देखील काकडीसारखा शकतो. कीटक नियंत्रण तज्ज्ञ आणि कीटकशास्त्रज्ञ निकोलस मार्टिन यांनी सांगितलं की, घरात अचानक काकडीचा वास येत असेल तर समजावं की घरात कोपरहेड साप किंवा रॅटल स्नेक आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा साप घाबरतात तेव्हा ते एक विशेष प्रकारचा वास सोडतात.
मराठी बातम्या/Viral/
Snake News: घरात आला असा वास तर समजून जा कुठेतरी लपलाय साप; एक्सपर्ट्सने सांगितलं कसं ओळखायचं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement