आपल्या मुलाला काही होऊ नये असं प्रत्येक आईला वाटतं, मात्र प्रत्येक व्यक्ती जगात येताना स्वतःचं नशीब घेऊन येते. त्यानुसार काही जणांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. इंग्लंडच्या ईजल ऑफ वे या शहरात राहणाऱ्या 28 वर्षांच्या मेगन ब्रिमसम यांना त्यांच्या मुलाच्या बाबतीत अशाच समस्यांचा सामना करावा लागला. मेगन यांचा पाच वर्षांचा मुलगा अर्लो एके दिवशी उन्हात खेळत होता, तेव्हा त्याच्या एका डोळ्यावर पांढऱ्या रंगाचा पडदा आला. ते पाहून मेगन घाबरल्या व त्याला रुग्णालयात घेऊन गेल्या. शहरातील सेंट मेरी रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी अर्लोचा डोळा तपासला.
advertisement
जगातील सर्वात महागडा टोल, घरातून गाडी निघताच लागतो कंजेशन चार्ज!
त्या तपासणीत असं लक्षात आलं की अर्लोच्या उजव्या डोळ्यावर एक मोठा मांसल भाग आहे. त्याला लंडनच्या रॉयल लंडन रुग्णालयात हलवावं असा सल्ला तिथल्या स्थानिक डॉक्टरांनी दिला. तिथल्या तपासणीत अर्लोला रॅटिनोब्लास्टोमा हा दुर्मीळ असा डोळ्यांचा कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं. हा शक्यतो लहान मुलांमध्ये आढळून येतो. हे कळल्यावर डॉक्टरांनी ताबडतोब अर्लोच्या डोळ्यांवर उपचार सुरू केले. त्याअंतर्गत त्याचा संक्रमित झालेला उजवा डोळा काढून टाकण्यात आला. त्यानंतर त्याला चार वेळा केमोथेरपी घ्यावी लागली. आता तो ठीक असून त्याला कृत्रिम डोळा बसवण्यात आला आहे.
अर्लोच्या आई मेगन ब्रिमसन या एक गायिका आहेत. “अर्लो आता व्यवस्थित असून आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्याला कृत्रिम डोळा लावण्यात आलाय. तो स्वतः तो डोळा स्वच्छ करतो. आता तो शाळेतही जातो. त्याचा मोठा भाऊ त्याचा सगळ्यात जवळचा मित्र आहे. अर्लोला शाळेत काही त्रास होणार नाही, याची तो काळजी घेतो,” असं मेगन ब्रिमसन यांनी म्हटलंय.
ऑगस्ट 2023 मध्ये ही घटना घडली. एके दिवशी उन्हात खेळताना अर्लोच्या डोळ्यावर पांढरा पडदा दिसला, पण मेगन यांना त्यात काळजी करण्यासारखं काही वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी अर्लोला नातेवाईकांकडे ठेवलं असता मेगन यांना त्यांचा फोन आला, की उन्हात खेळताना अचानक अर्लोचा डोळा पूर्णपणे पांढरा झाला. त्यावेळी मेगन गरोदर होत्या. अर्लोला दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनी त्याचे दोन्ही डोळे तपासले व रॅटिनोब्लास्टोमा झाल्याचं निदान केलं. 36 आठवड्यांच्या गरोदर असताना मुलाच्या आरोग्याबाबत इतकी गंभीर गोष्ट कळाल्यावर त्यांचे पती त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्या रात्री अर्लो दर अर्ध्या तासानं जागा होत होता. मात्र आता त्याची प्रकृती ठीक आहे.
रॅटिनोब्लास्टोमा या आजारामध्ये काही वेळा डोळ्यात एक पांढरी चमक किंवा पडदा आल्यासारखं दिसतं. त्याशिवाय डोळे सुजल्यासारखे दिसतात. चाइल्डहूड आय कॅन्सर ट्रस्टचे सीईओ रिचर्ड एश्टन यांनी सांगितलं, की रॅटिनोब्लास्टोमा हा दुर्मीळ आजार आहे, मात्र यूकेमध्ये दर आठवड्याला एका बालकावर याचे उपचार केले जातात. या आजाराची लक्षणं खूप सूक्ष्म असू शकतात. वरवर पाहता मुलं निरोगी दिसतात. मात्र मुलांच्या डोळ्यांबाबत काही जरी वेगळं आढळलं तरी लगेचच डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवावं असा सल्ला ते पालकांना देतात.