जगातील सर्वात महागडा टोल, घरातून गाडी निघताच लागतो कंजेशन चार्ज!
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
जर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात कारने प्रवास करत असाल तर तुम्हाला रस्त्यात कुठे ना कुठे टोल भरावा लागतो. काही वेळा तर शहरांतर्गतदेखील लोकांना टोल भरावा लागतो.
नवी दिल्ली : जर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात कारने प्रवास करत असाल तर तुम्हाला रस्त्यात कुठे ना कुठे टोल भरावा लागतो. काही वेळा तर शहरांतर्गतदेखील लोकांना टोल भरावा लागतो. काही टोल नाके स्थानिक लोकांना मासिक पास देऊन टोलमध्ये थोडी सवलत देतात; पण महागड्या टोलमुळे काही रस्त्यांवर गाडी चालवणं इतर रस्त्यांवरून प्रवास करण्याच्या तुलनेत महाग आहे. जगातला सर्वांत जास्त टोल कुठे आकारला जातो आणि या मार्गावरून प्रवास करताना किती टोल द्यावा लागू शकतो, याबाबत माहिती आहे का? जर तुमच्या मनात याबाबत अमेरिका, ब्रिटन, जपानसारख्या देशांची नावे येत असतील, तर तुम्ही चुकत आहात.
बजेट डायरेक्ट या ऑस्ट्रेलियन विमा कंपनीच्या अभ्यासानुसार, जगातला सर्वांत महागडा टोल मार्ग पेनसिल्व्हेनियामध्ये आहे. पेनसिल्व्हेनियातील टर्नपाइक रोडच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला सुमारे 113 डॉलर अर्थात 9500 रुपये मोजावे लागतात. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर या रस्त्यावरून प्रवास करताना प्रत्येक मैलासाठी तुम्हाला 31 सेंट द्यावे लागतात. हा टोल मार्ग फिलाडेल्फिया ते ओहायो सीमेपर्यंत सुमारे 360 किमी लांबीचा आहे.
advertisement
पेनसिल्व्हेनियानंतर कोणत्या देशात टोल चार्जेस जास्त आहेत?
पेनसिल्व्हेनिया टर्न पाइकनंतर ऑस्ट्रियातल्या ग्रॉस ग्लॉकनर हाय अल्पाइन रोडवर प्रवास करण्यासाठी 45.43 डॉलर टोल भरावा लागतो. त्यानंतर क्रोएशियातील ए-1 मोटरवेसाठी कमाल शुल्क 38.42 डॉलर आहे. टोलचा विचार करता, इतर युरोपीय आणि लॅटिन अमेरिकी देशांच्या तुलनेत अमेरिकेतले टोल दर तुलनेने किफायतशीर आहेत. टोलच्या बाबतीत सर्वांत महागड्या देशाविषयी बोलायचं झालं तर या यादीत स्वित्झर्लंड हा देश प्रथम क्रमांकावर आहे. तिथे सरासरी टोल चार्जेस 26.52 डॉलर आहेत. ऑस्ट्रिया 16.31 डॉलरसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे अमेरिकेत सरासरी टोल चार्जेस 5.38 डॉलर आहेत आणि हा देश जगात 11व्या स्थानावर आहे.
advertisement
वाहनांवरचा कन्जेशन टॅक्स किती आहे?
आता कन्जेक्शन टॅक्सविषयी माहिती जाणून घेऊया. हा असा टॅक्स गर्दीच्या वेळेत शहराच्या विशिष्ट भागात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर लादला जातो. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी, वायू प्रदूषण आणि हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी हा टॅक्स आकारला जातो. लंडन शहरात तुम्ही तुमचं वाहन घराबाहेर काढताच तुमच्याकडून हा टॅक्स वसूल केला जातो. फेब्रुवारी 2003मध्ये लंडनचे महापौर केन लिव्हिंगस्टन आणि टीएफएलने सुरू केलेलं हे शुल्क आता शहराचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
advertisement
हा टॅक्स किती असतो आणि किती काळ लागू राहतो? त्याचा फायदा काय?
हे शुल्क सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी सात ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत लागू असतं. हे दैनंदिन शुल्क सुरुवातीला पाच पौंड म्हणजेच सुमारे 500 रुपये निश्चित करण्यात आलं होतं. आता हे शुल्क वाढवून 15 पौंड अर्थात 1560 रुपये प्रतिदिन झालं आहे. लंडनमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या टॅक्समुळे 2003मध्ये रहदारीत 15 टक्के घट झाली. 1999 ते 2003 दरम्यान शहरातली लोकसंख्या 15 टक्क्यांनी वाढली. 2003मध्ये लंडनमध्ये बसचा वापर 30 टक्क्यांनी वाढला. जसं जसं हे शुल्क वाढत गेलं तशी लंडनमधली रहदारी कमी झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 26, 2024 11:29 PM IST