Chhatrapati Sambhajiangar: लष्करी कॅप्टनच्या गणवेशात फिरत होती महिला, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: उत्तर प्रदेशातील रहिवासी असणाऱ्या रुचिकाने गेल्या 10 ते 15 वर्षांत स्वतःचे प्रस्थ निर्माण केले आहे. लष्करी अधिकारी असल्याचे सांगणारी रुचिका लोकांना भविष्य देखील सांगत होती.

Chhatrapati Sambhajiangar: लष्करी कॅप्टनच्या गणवेशात फिरत होती महिला, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
Chhatrapati Sambhajiangar: लष्करी कॅप्टनच्या गणवेशात फिरत होती महिला, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
‎छत्रपती संभाजीनगर : दौलताबादमध्ये लष्कराचा गणवेश घालून फिरणारी एक महिला आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याकडून लष्कराशी सबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. रुचिका अजित जैन असं 48 वर्षीय महिलेचं नाव आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, ही महिला नेमकी कोण आहे आणि तिचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरातील धरमपूर येथील प्लॉट क्रमांक 16 येथे 48 वर्षीय रुचिका अजित जैन राहते. रुचिका लष्कराचा गणवेश वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे 11 सप्टेंबर रोजी पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात रुचिका जैन हिच्याकडून दोन प्रकारचे लष्करी गणवेश (युनिफॉर्म) जप्त केले. त्यावर कॅप्टन रैंकचे स्टार्स आणि 'स्पेशल फोर्स'चे बॅचेस लावले होते.
advertisement
यासोबतच 'डेबोनार सेक्युरिटी पीपल' असे लिहिलेले बनावट ओळखपत्र, लष्करी गणवेशातील तिचे फोटो असलेली फ्रेम, विविध संस्थांकडून मिळालेली सन्मानचिन्हे, पुरस्कार, निमंत्रण पत्रिका, टॉय एअर पिस्तूल व रायफल, वॉर मेमोरियलचे फोटो आदी जप्त करण्यात आले. आरोपी महिला अनेक ठिकाणी कॅप्टन म्हणून स्वतःची ओळख सांगून फिरत होती. प्रकरणात पुणे येथील दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकाने रेकी केल्याचे कळते.
advertisement
कोण आहे रुचिका जैन?
रुचिकाने धरमपूरमध्ये एक मंदिर स्थापन केले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. लष्करी अधिकारी असल्याचे सांगणारी रुचिका लोकांना भविष्य देखील सांगत होती. लष्करात अधिकारी असल्याने परिसरातील शाळा, महाविद्यालयात तिला आदराने बोलावत होते. मागील दोन-तीन महिन्यांपासून गुप्तचर यंत्रणा रुचिकावर पाळत ठेवून होती. उत्तर प्रदेशातील रहिवासी असणाऱ्या रुचिकाने गेल्या 10 ते 15 वर्षांत या भागात स्वतःचे प्रस्थ निर्माण केले आहे. ती आलिशान गाडीमध्ये फिरत होती आणि तिचे या भागात मोठे घर देखील आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajiangar: लष्करी कॅप्टनच्या गणवेशात फिरत होती महिला, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement