असाच एक धाडसी प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे आणि चर्चेचा विषय ठरत आहे. शाळेत शिकणाऱ्या एका तरुणीचा वारंवार पाठलाग करून त्रास देणाऱ्या एका तरुणाला तिने सार्वजनिक ठिकाणी थेट धडा शिकवला. याचाच हा व्हिडीओ आहे, जो व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही तरुणी आरोपीला रस्त्यावरच कानशिलात मारताना, चप्पलांनी मारहाण करताना आणि हातात वीट उचलून धमकावताना दिसते. एवढंच नाही तर तिने त्या तरुणाला कॉलरला धरून जोरदार सुनावलं. हा प्रकार युपीमधील गंगाघाट कोतवाली परिसरातील पोनी रोडवर घडली. जी शनिवारी घडली, आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला.
advertisement
आरोपीची ओळख 20 वर्षीय आकाश अशी झाली आहे, जो ई-रिक्शा चालक आहे आणि तो पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचं कामही करतो. TOIच्या वृत्तानुसार तो काही दिवसांपासून या मुलीचा पाठलाग करत होता आणि अश्लील टिप्पणी करत होता. घटनेच्या दिवशी त्याने मुलीचा रस्ता अडवून जबरदस्तीने सोबत येण्याचा आग्रह धरला. तेव्हा संतापलेल्या मुलीने प्रतिकार केला आणि त्याला रस्त्यावरच चोप दिला.
तरुणीचं असं म्हणणं आहे की आरोपी तिला खूप घाणेरड्या शब्दात कमेंट करायचा. क्या 'मस्त फिगर है....मेरे साथ चलेगी....क्या साइज़ है...' वैगरे-वैगरे अखेर जेव्हा तरुणीला ही सहन झालं नाही तेव्हा चिडून तिने याला विरोध केला.
मुलीने पोलिसांकडे औपचारिक तक्रार दिली नसली तरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ज्या देशात अजूनही पीडित महिलांनाच दोष दिला जातो, तिथे या तरुणीचं धाडस हे प्रेरणादायी आहे. तिने हा केवळ स्वतःसाठी लढा दिला नाही, तर प्रत्येक त्या मुलीचं प्रतिनिधित्व केलं आहे, जिला कधी ना कधी रस्त्यावर असुरक्षित वाटलं आहे.