ChatGPT सारखी AI टूल्स चालवण्यासाठी फक्त डेटाच नाही तर भरपूर पाणीदेखील लागतं. ChatGPT ला प्रश्न विचारल्यावर किती वीज आणि पाणी वापरलं जातं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अमेरिकेतील एका अहवालात या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे, ते धक्कादायक आहे.
ChatGPT किती पाणी पितं?
वॉशिंग्टन पोस्ट आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, रिव्हरसाइड यांच्या अहवालानुसार, जेव्हा तुम्ही ChatGPT ला प्रश्न विचारता तेव्हा ते त्या प्रश्नाचे उत्तर तयार करण्यासाठी सुमारे 500 मिलीलीटर पाणी खर्च करतं. याचा अर्थ असा की ChatGPT एका प्रश्नाचं उत्तर तयार करण्यासाठी अर्धा लीटर पाणी पितो. आता चॅट जीपीटी पाणी पितो म्हणजे काय, याचंही तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.
advertisement
बाबो! तब्बल 18 लाखांचा आहे हा 2 इंचाचा पासपोर्ट साइझ फोटो, असं काय आहे यात, कोण आहे ही महिला?
ChatGPT पाणी का लागतं?
हे पाणी मशीनद्वारे थेट वापरलं जात नाही, तर ते AI थंड ठेवण्यासाठी वापरलं जातं. ChatGPT सारखे AI मॉडेल डेटा सेंटर नावाच्या मोठ्या संगणक सर्व्हरवर चालवले जातात. हे सर्व्हर सतत प्रक्रिया करत राहतात आणि या काळात भरपूर उष्णता निर्माण होते. ही उष्णता कमी करण्यासाठी, या डेटा सेंटर्सना थंड ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पाण्याचा वापर केला जातो.
दोन प्रकारच्या प्रणाली आहेत, पहिली म्हणजे बाष्पीभवन शीतकरण प्रणाली जी वाफेवर आधारित शीतकरण प्रणाली आहे. दुसरी म्हणजे एअर कंडिशनिंग युनिट्स जी एसी आधारित प्रणाली आहेत. या प्रक्रियेत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार करण्यासाठी सुमारे अर्धा लीटर पाणी वापरलं जातं.
एकीकडे, एआयची वाढती लोकप्रियता तंत्रज्ञानात क्रांती घडवत आहे, तर दुसरीकडे ती पर्यावरणासाठीही धोका बनत आहे. असे अनेक क्षेत्र आहेत जिथं आधीच पाण्याची कमतरता आहे, तिथं डेटा सेंटर्समुळे पाण्याचं संकट आणखी वाढू शकतं.