World Poorest Man : जगातील सगळ्यात गरीब व्यक्ती! 4950000000000 कर्जाचा आकडा वाचतानाच बोबडी वळते, कोण आहे ती?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Worlds poorest man : असा माणूस आहे ज्याला जगातील सर्वात कर्जबाजारी आणि सर्वात गरीब व्यक्ती म्हटलं जातं. गरिबीचा अर्थ नेहमीच रिकामा खिसा नसतो, कधीकधी कर्जात बुडलेल्या व्यक्तीला सर्वात गरीब देखील म्हटलं जातं.
नवी दिल्ली : गरीब माणूस म्हटलं की एखाद्या झोपडीत राहणारा, फाटके फटके घालणारा, हातात थाळी घेऊन फिरणारा असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण तुम्हाला माहिती आहे का? खरंतर जगातील सर्वात गरीब माणूस जो एकेकाळी कोट्यवधी पैशांशी खेळत होता. आज तो डोक्यापासून पायापर्यंत कर्जात बुडालेला आहे. कोण आहे हा गरीब माणूस त्याची कहाणी काय आहे वाचूयात.
जगात सर्वात जास्त पैसे असलेल्या लोकांच्या नावांची यादी तुम्ही पाहिली असेल, तुम्हाला त्यापैकी अनेकांची नावे आठवत असतील. पण या माणसाचे नाव या यादीत सर्वात तळाशी आहे. तो असा माणूस आहे ज्याला जगातील सर्वात कर्जबाजारी आणि सर्वात गरीब व्यक्ती म्हटलं जातं. गरिबीचा अर्थ नेहमीच रिकामा खिसा नसतो, कधीकधी कर्जात बुडलेल्या व्यक्तीला सर्वात गरीब देखील म्हटलं जातं. असाच गरीब आहे तो फ्रान्सचा जेरोम केरविएल.
advertisement
कोण आहे जेरोम केर्व्हिएल?
जेरोम केर्व्हिएलचा जन्म 11 जानेवारी 1977 रोजी फ्रान्समधील पोंट-ल'अब्बे एका लहानशा शहरात झाला. त्याचं कुटुंब सामान्य होतं. त्याची आई हेअर स्टायलिस्ट होती आणि त्याचे वडील लोहार म्हणून काम करायचे. अभ्यासात चांगला असलेल्या जेरोमने लियोनमधील लुमिएर विद्यापीठातून वित्त विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आणि नंतर थेट फ्रान्समधील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बँकेत, सोसायटी जनरलमध्ये नोकरी मिळवली.
advertisement
तो बँकेत ज्युनियर डेरिव्हेटिव्ह ट्रेडर म्हणून काम करत होता. पण तंत्रज्ञान आणि ट्रेडिंग कौशल्यांबद्दलची त्याची समज इतकी प्रबळ होती की लवकरच तो कोट्यवधींचा व्यवहार करू लागला. तो बँकेच्या डेल्टा वन विभागात काम करत होता जो स्टॉक ट्रेडिंग, अल्गोरिदम आणि गुंतवणुकीशी संबंधित आहे.
advertisement
जेरोम केर्व्हिएल काय केलं?
जेरोमला संगणक प्रोग्रामिंग आणि ट्रेडिंग सिस्टीमचे चांगलं ज्ञान होतं आणि त्याने या ज्ञानाचा गैरवापर केला. बँकेच्या अंतर्गत व्यवस्थेतील कमकुवतपणाचा फायदा घेऊन जेरोमने आर्बिट्रेज ट्रेडिंग सुरू केले. या काळात त्याने कंपनीच्या पैशांचा वापर करून अब्जावधी डॉलर्सचा व्यवहार केला. सुरुवातीला त्याला प्रचंड नफा झाला. त्याने एका वर्षात सुमारे 73 अब्ज डॉलर्सचा व्यवहारही केला.
advertisement
सुरुवातीला बँकेला याची माहितीही नव्हती कारण जेरोम तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक अनियमितता लपवत असे. पण 2008 मध्ये जेव्हा बँकेला संशय आला आणि चौकशी करण्यात आली तेव्हा 19 जानेवारी 2008 रोजी त्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला. या खुलाशाने बँकेला हादरवून टाकलं.
बँकेचं 7.2 अब्ज डॉलर्सचं नुकसान, जेरोमवर 495000 कोटींचं कर्ज
या घोटाळ्याची चौकशी केल्यानंतर असं दिसून आलं की जेरोमच्या चुकीच्या व्यवहारामुळे बँकेला सुमारे 7.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 495000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. ही रक्कम आता त्याच्या डोक्यावर कर्ज बनली आहे, ज्यामुळे तो जगातील सर्वात गरीब व्यक्ती बनला आहे.
advertisement
VIDEO : ट्रेनमध्ये मोबाईलने रेकॉर्ड करत होता सुंदर दृश्य, त्यानंतर जे दिसलं ते पाहून थरथर कापू लागला
या घटनेनंतर 2015 मध्ये त्याला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने त्याला विश्वासघात, फसवणूक आणि अनधिकृत संगणक वापराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्याने त्याची शिक्षा पूर्ण केली आहे, परंतु कर्ज अजूनही त्याच्यावर आहे.
advertisement
तुरुंगातून सुटल्यानंतर, जेरोम आता सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा त्याला नेहमीच जगातील सर्वात गरीब व्यक्ती बनवेल.
view commentsLocation :
Delhi
First Published :
July 13, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/Viral/
World Poorest Man : जगातील सगळ्यात गरीब व्यक्ती! 4950000000000 कर्जाचा आकडा वाचतानाच बोबडी वळते, कोण आहे ती?


