एका व्यक्तीने मॉलमधील सामान नेण्यासाठी लुंगीचा जुगाड केल्याचं पहायला मिळालं. तो मॉलमध्ये लुंगी घालून गेला आणि कॅश काऊंटवर गेल्यावर ती लुंगी काढली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाहीय.
Shocking News : पाणी पिणं महिलेसाठी ठरलं जीवघेणं, घडलं असं की झाली भयानक अवस्था
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती मॉलमध्ये सामान घेत आहे. विषेश म्हणजे तो लुंगी घालून मॉलमध्ये आला आहे. सामान घेतल्यानंतर तो कॅश काऊंटवर जाताना दिसत आहे. तिथे जाताच तो आपली लुंगी काढतो. त्यानं आत जीन्स घातली होती. लुंगी काढून तो त्यामध्ये खरेदी केलेलं सामान भरायला लागतो. हे पाहून कॅश काऊंटरवर असलेली मुलगी पण हसू लागते. इतर लोकही त्याच्याकडे पाहू लागतात. तो मस्त सगळं सामान लुंगीत भरून घेऊन जातो.
@HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 2 मिनिट 1 सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट येत आहेत.
दरम्यान, असे मजेशीर, जुगाडू व्हिडीओ सोशल मीडियावर कायमत पहायला मिळतात. आपल्या कल्पनाच करु शकत नाही अशी गोष्टींपासून लोक जुगाड करतात. असे जुगाडू व्हिडीओही समोर येत असतात.
