TRENDING:

Plane Accident : Black Box काय आहे? आणि त्यामुळे कसं कळणार अहमदाबाद विमान अपघात कसा झाला?

Last Updated:

how does black box tell about airplane crash : लवकरच ब्लॅक बॉक्सच्या मदतीनं या घटनेचा आढावा घेण्यात येईल. खरंतर या अपघातात ब्लॅक बॉक्स मोठी भूमिका बजावणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान गुजरातच्या अहमदाबादमध्ये कोसळलं आहे. मेघानीनगर परिसरात हा अपघात घडला. या विमानात तब्बल २३२ प्रवासी आणि १० केबिन क्रू असे एकूण २४२ जण प्रवास करत होते.
ब्लॅक बॉक्सचं कार्य
ब्लॅक बॉक्सचं कार्य
advertisement

अहमदाबाद विमानतळावरुन टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत हा अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत 50 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हा अपघात कसा आणि का घडला याची माहिती समोर आलेली नाही. पण घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. पण लवकरच ब्लॅक बॉक्सच्या मदतीनं या घटनेचा आढावा घेण्यात येईल. खरंतर या अपघातात ब्लॅक बॉक्स (how does black box tell about airplane crash) मोठी भूमिका बजावणार आहे.

advertisement

आता हा ब्लॅक बॉक्स काय आहे? असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल, खरंतर आजच्या आधुनिक विमानांतल्या प्रवासात एक अत्यंत महत्त्वाचा आणि रहस्यमय घटक म्हणजे ब्लॅक बॉक्स. या डिव्हाइसचे मुख्य हेतू एखादा विमान अपघात झाला तर त्याचे कारणं शोधणे आणि भविष्यात अशा घटना टाळणं.

ब्लॅक बॉक्सची काही वैशिष्ट जाणून घेऊ.

याचं नाव जरी ‘ब्लॅक बॉक्स’ असलं तरी तो साधारणता चॉकलेटी-नारंगी रंगाचा (international orange) असतो, ज्यामुळे तो अपघातस्थळावर सहज ओळखता येतो.

advertisement

विमानांच्या शेवटी (टेल भागात) स्थिर असलेल्या भागात या डिव्हाइसला लावलं जातं, जो दोन महत्वाच्या घटकांनी बनलेला असतो.

1) एक म्हणजे Flight Data Recorder (FDR) - इथं इंजिन, वेग, उंची, फ्लॅप्स, ब्रेकिंग आणि इतर जवळपास 88–1000+ नोंदी घेतल्या जातात

2)दुसरं आहे Cockpit Voice Recorder (CVR) – यामध्ये पायलटांमध्ये, ATC किंवा इतर आवाजांचे अंतिम 2 ते 25 तासांचे ऑडिओ रेकॉर्डिंग असते.

advertisement

या सगळ्यागोष्टी अपघाताचं कारण शोधण्यात मदत करतात. एवढंच नाही तर अपघाताच्या वेळी पायलट, क्रु मेमंबर्स यांच्यामध्ये काय संभाष सुरु होतं, हे देखील ओळखता येतं.

पण आता प्रश्न असा की अहमदाबादमध्ये घडलेल्या इतक्या मोठ्या स्फोटामध्ये तो ब्लॅक बॉक्स चांगल्या स्थितीत राहिल का?

तर हो, खरंतर हे उपकरण असं बनवलं जातं की कोणत्याही अपघातात, कितीही मोठ्या आगीच्या ज्वाळात पाण्याच्या खोलीत गेलं तरी सुद्धा काम करतं आणि त्यातील डेटा सेव्ह रहातो.

advertisement

यामुळे, विमान अपघात होऊनही ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो आणि सहसा शोधला जातो.

मराठी बातम्या/Viral/
Plane Accident : Black Box काय आहे? आणि त्यामुळे कसं कळणार अहमदाबाद विमान अपघात कसा झाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल