कोरबा : अनेक प्राणी असे असतात जे वर्षभर बिळात दडून पावसाळ्यातच बाहेर पडतात, जसं की बेडूक. तर काही प्राणी असेही असतात, जे वर्षभर बाहेर फिरतात, परंतु उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्यांचा जोर आणखी वाढतो, जसं की साप. जंगलांशेजारी किंवा गावात राहणाऱ्या लोकांना सापाचा धोका सर्वाधिक असतो. काही लोक साप चावला की, घरगुती उपाय करतात. काही लोक तर, अंधश्रद्धेला बळी पडून साप चावलेल्या जागेवर मंत्रोच्चार करतात. ज्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व उपाय करण्यात वेळ न घालवता साप चावल्यावर त्वरित रुग्णालय गाठावं, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
झारखंडमधील कोरबा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक चंद्रकांत भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वच साप विषारी नसतात. भारतात एकूण 13 प्रजातींचे सर्वाधिक विषारी साप आढळतात. त्यापैकी 4 अत्यंत धोकादायक प्रजाती मानल्या जातात. त्यात कोब्रा म्हणजेच नाग, रसेल व्हायपर, सॉ-स्केल्ड व्हायपर आणि करैत या प्रजातींचा समावेश होतो. यातही नाग आणि करैत सर्वाधिक धोकादायक असतात.
(नागापेक्षाही खतरनाक, चौपट विषारी! 'या' सापाला म्हणतात Silent killer)
सापांमध्ये हिमोटॉक्सिक, न्यूरोटॉक्सिक आणि मायोटॉक्सिक असं 3 प्रकारचं विष असतंं. हिमोटॉक्सिक विष रक्त पेशींवर हल्ला करतं. त्यामुळे साप चावलेल्या व्यक्तीच्या शरिरातून विविधमार्गे रक्तस्त्राव होणं, तिला रक्ताच्या उलट्या होणं अशी लक्षणं दिसून येतात. तर, न्यूरोटॉक्सिक विष मज्जासंस्थेवर हल्ला करतं.
(कोंबडीला अंड द्यायला कोंबड्याची गरज असते का? 99 टक्के लोकांना माहित नसेल)
सापांच्या चार धोकादायक प्रजाती खालीलप्रमाणे…
नाग (कोब्रा) : नाग चावल्यास काही वेळातच व्यक्तीची मज्जासंस्था काम करणं थांबवते आणि तिला अर्धांगवायू होतो. कारण नागात मज्जासंस्था आणि हृदयावर हल्ला करणारं विष असतं. या विषामुळे दृष्टीही कमी होऊ शकते.
रसेल व्हायपर : अजगरासारखा दिसणारा हा साप चावल्यास त्याचं विष व्यक्तीच्या शरिरात 120 ते 250 ग्रॅमपर्यंत आत शिरतं. या सापामध्ये हिमोटॉक्सिक विष असतं, त्यामुळे व्यक्तीच्या हृदयाचे ठोके थांबतात आणि रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात. शिवाय हळूहळू एक-एक अवयव निकामी झाल्याने तिचा मृत्यू होतो.
सॉ-स्केल्ड व्हायपर : हा साप प्रामुख्याने राजस्थानच्या डोंगराळ भागात आढळतो. इतर सापांच्या तुलनेत त्याची लांबी कमी असते. मात्र करड्या रंगावर काळे, पांढरे डाग असल्यामुळे तो दिसायला अतिशय किळसवाणा दिसतो. शिवाय लांबीने लहान असल्याने तो इतर सापांच्या तुलनेत झपकन् हल्ला करतो.
करैत : हा साप प्रामुख्याने रात्रीच्या अंधारात बिळाबाहेर पडतो. तो व्यक्ती झोपेत असताना तिच्यावर हल्ला करतो. महत्त्वाचं म्हणजे तो चावल्यावर केवळ डास चावल्यासारखं जाणवतं, परंतु त्याचं विष शरीरभर पसरून झोपेतच व्यक्तीचा मृत्यू होतो. म्हणूनच हा भारतातला सर्वात खतरनाक साप मानला जातो. तो दिसायला अगदी सडपातळ आणि प्रचंड लांब असतो. त्याच्या काळ्या शरिरावर दोन-दोन पांढरे पट्टे असतात.
साप चावल्यावर नेमकं काय करावं?
ज्या व्यक्तीला साप चावला असेल, तिला एकाच जागेवर झोपून ठेवावं, जेणेकरून चालल्या-फिरल्यानंं विष तिच्या शरीरभर पसरणार नाही. त्या व्यक्तीला धीर द्यावा. ती घाबरल्यास तिच्या शरिरातून रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो, जे अत्यंत धोकादायक असतं. ज्या ठिकाणी साप चावला असेल, त्याच्या खाली आणि वर घट्ट पट्टी बांधावी, जेणेकरून तिथलं रक्त शरिराच्या इतर भागात पोहोचणार नाही. सर्पदंशाची जागा साबणाने स्वच्छ धुवावी आणि शक्य तेवढ्या लवकर त्या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जावं. डॉक्टर अँटीव्हेनम इंजेक्शन देतात. वेळेत उपचार झाल्यास त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा