TRENDING:

Viral Video - पालक मुलांच्या डोक्यावर फोडत आहेत अंडी; या विचित्र ट्रेंडमागे कारण काय? आहे मोठा धोका

Last Updated:

लहान मुलांच्या डोक्यावर अंडी फोडण्याचा हा ट्रेंड जितका मजेशीर वाटतो तितकाच धोकादायक आहे. तज्ज्ञांनी याबाबत सावध केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : सोशल मीडिया हे असे जग आहे की जिथे एखादी गोष्ट व्हायरल होऊ लागली तर लोक तेच करायला लागतात आणि लवकरच तो ट्रेंड बनतो. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक विचित्र ट्रेंड पाहिले असतील. सध्या असाच आणखी एक ट्रेंड व्हायरल होतो आहे. ज्यात पालक लहान मुलांच्या डोक्यावर अंडी फोडताना दिसत आहेत. लहान मुलांच्या डोक्यावर अंडी फोडण्याचा हा ट्रेंड जितका मजेशीर वाटतो तितकाच धोकादायक आहे. तज्ज्ञांनी याबाबत सावध केलं आहे.
एग क्रॅक चॅलेंज
एग क्रॅक चॅलेंज
advertisement

'एग क्रॅक चॅलेंज' असं या ट्रेंडचं नाव आहे. या चॅलेंजअंतर्गत पालक अंडं आपल्या मुलांच्या डोक्यावर फोडत आहेत. समोर कॅमेरा ठेवून हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करत आहेत आणि त्याचा व्हिडीओही पोस्ट करता आहेत. यात मुलांच्या रिअॅक्शनही वेगवेगळ्या आहेत. काही मुलं हसण्यावारी घेत आहेत. तर काहींना यामुळे दुखापत होताना दिसत आहे. तर पालक मात्र हसत आहेत.

advertisement

Viral News - हा काय चमत्कार! पतीसोबत रोमान्सनंतर लगेच प्रेग्नंट झाली महिला; एका तासातच बाळाला जन्मही दिला

हा ट्रेंड सुरू झाला कसा आणि लहान मुलांवर हा प्रयोग का केला जात आहे, असा प्रश्न पडला असेल. तर हे सर्व पतीबाबत असमाधानी असलेल्या महिलांनी आपल्या आळशी पतींना जे किचनमध्ये मदत करत नाहीत. त्यांना लक्ष्य करण्यापासून या ट्रेंडची सुरुवात झाली. या महिन्याच्या सुरुवातीला सायला मून नावाच्या महिलेने तिच्या नवऱ्याच्या डोक्यावर अंडी फोडल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा ट्रेंड लोकप्रिय होत राहिला आणि कुटुंबातील इतर सदस्यही याचा भाग बनले.

advertisement

लोक हे अंडा क्रॅक चॅलेंज फक्त व्हायरल करण्यासाठी करत आहेत. या ट्रेंडमागील कारण एकच आहे, प्रसिद्ध होणं. मात्र तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला आहे.

advertisement

स्नेक मॅनचा हा Video पाहून तुम्हालाही भरेल धडकी, एक दोन नव्हे तर तीन कोब्रांना पकडलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

पालकांसाठी हा एक छोटा आणि किरकोळ विनोद असू शकतो, परंतु तज्ज्ञांनी असं करणं चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. एबीसी न्यूजशी बोलताना बालरोगतज्ज्ञ मेघन मार्टिन यांनी सांगितलं की, यामुळे मुलांना वाईट वाटू शकतं, दुखापत होऊ शकतं. शिवाय खराब झालेल्या अंड्यांमध्ये आढळणारे साल्मोनेला बॅक्टेरिया त्यांच्या शरीरात जाऊन यामुळे मुलं आजारी पडू शकतात.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Viral Video - पालक मुलांच्या डोक्यावर फोडत आहेत अंडी; या विचित्र ट्रेंडमागे कारण काय? आहे मोठा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल