बिहारमधील हाजीपूरमधील ही धक्कादायक घटना आहे. भटौली भगवान गावातील मिथिलेश पासवान याचा शुक्रवारी पत्नी प्रियंका कुमारीसोबत वाद झाला. वाद इतका वाढला की रागाच्या भरात प्रियंकाने मिथिलेशचं गुप्तांग कापलं.
सासूच्या पोटी जन्माला आलं जावयाचं बाळ, मुलीला झाला आनंद, सगळ्यांनी केलं कौतुक
त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार रुग्णालयातील डॉक्टर विशाल कुमार यांनी सांगितलं, प्राथमिक तपासात असं दिसून आलं की मिथिलेशच्या शरीराच्या वरच्या भागावर आणि त्याच्या लिंगावरही जखमा होत्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मिथिलेशचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आरोपी पत्नीला पतीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवलं.
Chanakya Niti : महिला पुरुषांपासून काय काय लपवतात?
माहितीनुसार, पत्नी तिच्या प्रियकरासोबत फोनवर बोलत होती, ज्याची माहिती पतीला मिळाली. यानंतर पतीने याबद्दल विचारणा केली. या काळात वाद इतका वाढला की रागाच्या भरात पत्नीनं असं कृत्य केलं.