आईची नजर चुकवून किंवा आईचं न ऐकून या मुलाने जे केलं ते तो काय व्हिडीओ पाहणारं कोणतंच मूल आणि पालक आयुष्यात विसरणार नाहीत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक महिला जिने बेड किंवा पलंग उघडला आहेत. त्यात ती सामान लावत आहे. इतक्यात तिचा मुलगा तिथं येतो आणि तो पलंगात जाऊन झोपतो. तेव्हा आईचं लक्ष जातं. ती लगेच त्याला मारून तिथून बाहेर काढते. मुलगा तिथून निघून जाते. आई पुन्हा पलंग आवरण्यात बिझी होते.
advertisement
थोड्या वेळाने मुलगा पुन्हा तिथं येतो आणि तो पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन झोपतो. यावेळी मात्र त्याच्या आईचं लक्ष नव्हतं. तिचं कामही आवरलेलं असतं. त्यामुळे ती पलंग बंद करते आणि तिथून निघून जाते. सुदैवाने आई पलंगापासून फार लांब गेलेली नसते आणि मुलगा ओरडू लागतो, रडू लागतो. आईला मुलाच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज येतो. आवाज पलंगातून येत आहे हे तिला समजतं म्हणून ती धावत पुन्हा तिथं येते. पलंग उघडते आणि आत पाहते तर काय मुलगा तिथं रडत असतो.
जर मुलगा रडला नसता, त्याने आवाज दिला नसता आणि आईलाही त्याचा आवाज ऐकू आला नसता तर अनर्थ घडला असता. @geetappoo या X अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'कामात इतकं गुंतून जाऊ नका की तुमच्या मुलांना विसरून जा.'
ही बातमी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जेणेकरून हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले. पालक आणि मुलंही पाहतील आणि यातून तरी सावध होतील.