अंधेरीतील लोखंडवालामधील ही घटना आहे. इथल्या ब्रुकलिंक हाऊसिंग सोसायटी इमारतीत शनिवारी सकाळी आग लागली. या आगीत एका 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अभिना संजनवाला असं या महिलेचं नाव आहे. तिच्यासोबत तिच्या दोन पाळीव श्वानांचाही मृत्यू झाला आहे.
आई गं! 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना, झाला धक्कादायक खुलासा
advertisement
माहितीनुसार अभिना तिचा नवरा कार्तिक आणि दोन श्वानांसह बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर राहत होती. बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. तेव्हा अभिना आपल्या दोन्ही श्वानांना घेऊन टेरेसच्या दिशेने जात होती. तिने श्वानांना टेरेसवर जायला सांगितलं. पण तिचे श्वान तिला खाली खेचू लागले. त्यांनी तिला ओढत खाली नेलं. श्वान खालच्या दिशेने पळाल्याने अभिनाही त्यांच्या मागे मागे पळाली.
पहिल्या मजल्यावर आग लागलेली असल्याने धूर पसरला होता. खाली येताच या धुरात अभिना आणि तिचे दोन्ही श्वान गुदमरले आणि त्यांचा मृत्यू झाला.
स्थानिकांनी सांगितलं की, अभिनाने श्वानांना टेरेसवर जायला सांगितलं. पण तिच्या श्वानांनी तिला खाली ओढत आणलं असावं. तिच्याकडे ज्या कुत्र्यांची प्रजाती होती ती सतत पुढेच पळणारी होती. संध्याकाळीसुद्धा जेव्हा ती त्यांना फिरायला बाहेर न्यायची तेव्हा ते पुढे पळायचे. तिला ओढत न्यायचे.
दरम्यान अभिनाचा नवरा कार्तिकसह इतर 6 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने आग फक्त पहिल्याच मजल्यावर राहिली ती पसरली नाही. पण धुराचे लोट सगळीकडे पसरले होते. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होती. बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं.