मुलांच्या सुरक्षेसाठी घरात लावला कॅमेरा, अन् नवऱ्याचं नको तेच कांड आलं समोर, बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली

Last Updated:

Husband affair caught in camera : महिलेने आपल्या नवऱ्याचे असे व्हिडीओ पाहिले की तिला राग अनावर झाला आणि तिने बदला म्हणून सगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

News18
News18
बीजिंग : हल्ली बरेच लोक आपल्या घरात कॅमेरे लावून घेतात. विशेषतः घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी पालक कॅमेरा लावतातच. अशीच एक महिला जिने आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी म्हणून घरात छुपा कॅमेरा लावला. पण यात तिच्या नवऱ्याचं कांड कैद झालं. कॅमेऱ्यात तिला जे दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
ली नावाची ही महिला. जिनं तिचा पती ही याच्या घरात आपल्या भावंडांच्या मदतीने छुपा कॅमेरा लावला. एक दिवस तिने कॅमेरातील फुटेज पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. तिचा नवरा तिला दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवताना दिसला. ही महिला तिचा नवरा भाड्याने राहत असलेल्या घराची मालकीण होती. वांग असं तिचं नाव.
advertisement
महिलेने आपल्या नवऱ्याचे असे विवाहबाह्य संबंध पाहिल्यानंतर तिला राग अनावर झाला आणि तिने नवरा आणि तिच्या प्रेयसीचे सगळे प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
वांगने हे व्हिडीओ पाहिले. आपले प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समजताच तिने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी लीला व्हिडिओ काढून टाकण्याचं आवाहन केलं पण तिने नकार दिला. त्यानंतर वांगने ली आणि तिच्या भावंडांविरुद्ध गोपनीयता अधिकार, प्रतिष्ठा आणि प्रतिमा अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत खटला दाखल केला. वांगने भरपाई, सार्वजनिक माफी आणि सर्व मजकूर काढून टाकण्याची मागणीही केली.
advertisement
टेंग काउंटी कोर्ट म्हणालं, की लीने वांगच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं उल्लंघन केलं. पण नुकसान आणि सार्वजनिक माफीचे दावे नाकारले. म्युनिसिपल इंटरमीडिएट पीपल्स कोर्टानेसुद्धा हा निर्णय कायम ठेवला. वांगने विवाहित पुरूषाशी संबंध ठेवून सार्वजनिक सुव्यवस्था आणि सामाजिक मूल्यांचं उल्लंघन केलं आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. वांगच्या मानसिक आरोग्यावर कोणताही गंभीर परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे नव्हते, म्हणून भरपाई आणि माफीची मागणी फेटाळण्यात आली.
advertisement
त्याचवेळी लीच्या कृतींचे वर्णन मर्यादेपलीकडे असल्याचं सांगण्यात आलं.  स्वतःच्या बचावात ली म्हणाली की तिने कॅमेरा बसवला कारण घर तिच्या पतीचं होतं आणि तिला मुलाची सुरक्षितता सुनिश्चित करायची होती. व्हिडिओ शेअर करणं ही तिच्या पतीच्या अविश्वासाविरुद्ध तिची प्रतिक्रिया होती.
advertisement
साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार हे प्रकरण ऑगस्ट 2023 चं आहे. चीनमध्ये खूप व्हायरल होत आहे. काही लोक म्हणतात की प्रेयसीने भरपाई मागणं हास्यास्पद आहे, तर काही लोक असे मानतात की पत्नीला फसवणूकीचे पुरावे गोळा करण्याचा अधिकार आहे. तुमची या प्रकरणावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
मुलांच्या सुरक्षेसाठी घरात लावला कॅमेरा, अन् नवऱ्याचं नको तेच कांड आलं समोर, बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement