आई गं! 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना, झाला धक्कादायक खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Child Private Part Pain : 4 वर्षांचं मूल शाळेतून घरी आलं आणि आल्या आल्या त्याने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं सांगितलं. त्याच्या या वेदनेमागील धक्कादायक कारण समोर आलं.
नवी मुंबई : लहान मुलं दिवसभरात पालकांकडे काही ना काही तक्रार करत असतात. याने मारलं, त्याने पाडलं, तो मला हे देत नाही, ती ते देत नाही. इथं दुखतंय, तिथं दुखतं. असंच एक 4 वर्षांचं मूल आपल्या आईकडे आपली समस्या घेऊन आला. आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं त्याने सांगितलं. त्यामागील कारण असं की आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
नवी मुंबईच्या नेरळमधील ही धक्कादायक घटना आहे. 4 वर्षांचं मूल शाळेतून घरी आलं आणि आल्या आल्या त्याने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं सांगितलं. त्याच्या या वेदनेमागील धक्कादायक कारण समोर आलं. मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते.
advertisement
मुलाने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं सांगितल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याची अधिक चौकशी केली. तेव्हा त्याने फक्त बस अंकल इतकंच म्हटलं. यानंतर त्याच्या स्कूल बस ड्रायव्हरला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
25 वर्षीय आरोपी सुजीत दासला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement
आरोपीने पेन्सिलासरख्या काही वस्तूचा वापर तर केला नाही, याचा तपास पोलीस कर आहेत. बसचे सीसीटीव्ही फुटेज शोधत आहेत. तसंच बसमध्ये महिला अटेंडंट होती की नाही, आरोपीने स्कूल परिसरात प्रवेश केला की नाही. याचाही तपास सुरू आहे.
याआधी बदलापुरात एका क्लिनरने दोन प्री-प्रायमरी विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचं प्रकरण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये समोर आलं होतं.
advertisement
विवाहित शिक्षिकेने केलं अल्पवयीन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण
हेन्रिको काउंटीमधील हंगेरी क्रीक मिडल स्कूलमध्ये शिकवणाऱ्या 25 वर्षांच्या मेगन पॉलीन जॉर्डन या विवाहित शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या घरात घुसून त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचं कबूल केलं होतं. हेन्रिको काउंटी कॉमनवेल्थमधील अॅटर्नी कार्यालयाने या प्रकरणी एक निवदेन दिलं होतं. या निवेदनात म्हटलं की, एका अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणासह चार गंभीर गुन्ह्यांमध्ये मिस जॉर्डनला दोषी ठरवून 50 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला.
advertisement
रिचमंड टाईम्स-डिस्पॅचमध्ये प्रसिद्ध झाल्यानुसार, हेन्रिको काउंटी कॉमनवेल्थच्या अॅटर्नी शॅनन टेलर यांनी मंगळवारी उघड केलं की, 2022-23 या शालेय वर्षात मिस जॉर्डनने ती शिकवत असलेल्या वर्गातील 14 वर्षांच्या विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवले होते. टेलर यांनी पुढे असंही सांगितलं की, आरोपी शिक्षिका अनेकदा पीडित विद्यार्थ्याच्या घरी जायची आणि त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवायची. तपासादरम्यान विद्यार्थ्याच्या बेडवरून तिचा डीएनए मिळाला होता. मिस जॉर्डनसारख्या आरोपीला शिक्षा दिल्याबद्दल टेलर यांनी कायदा व सुव्यवस्थेचे आभारही मानले आहेत.
advertisement
हेन्रिको काउंटी पोलिसांनी दिलेल्या प्रेस रिलीजनुसार, आरोपी शिक्षिकेला जून 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. यामध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, व्हर्जिनिया कोड अंतर्गत 17 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती लैंगिक कृतीस संमती देण्यास कायदेशीररित्या सक्षम नसतात. जून 2023 च्या सुरुवातीस हेन्रिको पोलिसांना या प्रकाराबाबत टिप मिळाली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आणि कसून तपास केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी तपासादरम्यान या लैंगिक गुन्ह्यात सहभाग असलेल्या व्यक्तीविरोधात पुरेसे पुरावे जमा केल्याने गुन्हा दाखल करणं शक्य झालं.
advertisement
Location :
Maharashtra
First Published :
April 27, 2025 11:48 AM IST
मराठी बातम्या/Viral/
आई गं! 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना, झाला धक्कादायक खुलासा