अँजेला पेआंग असं या महिलेचं नाव आहे. अँजेलाना तिचा चुलत भाऊ मायकल लीशी लग्न केलं आहे. दोघंही लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम करत होते. एकमेकांचा हात धरून चालायचे, गुपचूप किसिंग करायचे. ते 7 वर्षांचे असताना मायकलच्या भावाने त्यांना कपाटात चुंबन घेताना पाहिलं. या घटनेनंतर त्यांना आपण काहीतरी चूक केली आहेस असं वाटलं. पण मायकेलने त्या दिवशी अँजेलाच्या आईला तो मोठा झाल्यावर तिच्याशी लग्न करेल, असं सांगितलं. त्यानंतर अँजेलाच्या आईने त्यांना फक्त चांगले मित्र राहण्याचा सल्ला दिला.
advertisement
बोंबला! प्रायव्हेट पार्टचा आकार वाढवायला गेला पुरुष, सर्जरीदरम्यान डॉक्टरांकडून मोठी चूक
जेव्हा ते दहा वर्षांचे झाले तेव्हा कुटुंबाने जाणूनबुजून त्यांना एकमेकांपासून दूर ठेवण्यास सुरुवात केली कारण त्यांना त्यांच्या नातं पटत नव्हतं. 12 भावंडांपैकी सर्वात मोठी अँजेला एका मोठ्या मॉर्मन कुटुंबातील होती. तिची आई देखील मायकेलच्या आसपास असल्याबद्दल तिला फटकारत होती. वडिलांच्या नोकरीमुळे तिला अनेकदा परदेशात जावं लागत असे, ज्यामुळे ते अनेक वर्षे एकमेकांपासून दूर राहिले.
काही वर्षांनंतर जेव्हा ते 17 वर्षांचे झाले तेव्हा ते त्यांच्या आजीच्या घरी भेटले, जिथं त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पण अँजेलाला अजूनही तो क्षण आठवतो जेव्हा ती आणि मायकेल पाईप क्लीनरपासून अंगठ्या बनवून एकमेकांना घालत असत. काही वर्षांनी अँजेला आणि मायकेल दोघांनीही दुसऱ्याशी लग्न केलं. अँजेलाला तीन मुलंही झाली.
पण दोघांचंही लग्न तुटलं आणि त्यांचा घटस्फोट झाला. 2018 मध्ये ते पुन्हा फेसबुकवर भेटले. दोघांनीही ऑनलाइन चॅटिंग सुरू केलं आणि त्यांना कळलं की दोघंही घटस्फोटित आहेत आणि युटामध्ये राहतात. लवकरच दोघंही पुन्हा भेटले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण युटामध्ये चुलत भावंडांमधील लग्न बेकायदेशीर आहे, असं लग्न केल्यास 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, हे त्यांना माहिती पडलं. त्यामुळे ते शेजारच्या कोलोरॅडो राज्यात गेलं आणि तिथं लग्न केले, इथं या नात्यासाठी कोणतीही कायदेशीर शिक्षा नव्हती. मायकल आणि अँजेला यांनी युटामध्ये चुलत भावाच्या लग्नाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी याचिकाही दाखल केली.
संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या लग्नाची माहिती देण्यासाठी त्यांनी फॅमिली फेसबुक ग्रुपवर किस घेतानाचा एक फोटो पोस्ट केला जेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाला या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा अँजेलाचे पालक आश्चर्यचकित झाले आणि त्यांची मुलं पूर्णपणे धक्क्यात होती. मुलांच्या नाराजीला न जुमानता अँजेलाने मायकेलसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना ग्रुपमधून बाहेर काढण्यात आलं.
2020 मध्ये अनुवांशिक चाचणी घेतल्यानंतर त्यांचा मुलगा एरिकचा जन्म झाला. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. मुलाच्या जन्मानंतर फक्त 14 महिन्यांनी 2021 मध्ये मायकलचा मृत्यू झाला. त्याला अनेक वर्षांपासून ड्रग्जचं व्यसन होतं, हेच त्याच्या दुःखद अंताचं कारण बनलं. मायकलच्या मृत्यूनंतर, अँजेला म्हणाली की ती तिची लव्हस्टोरी शेअर करून तिच्या दुःखाचा सामना करत आहे.