हॉली जेन असं या महिलेचं नाव आहे. अमेरिकेत राहणारी 42 वर्षांची हॉली 3 मुलांची आई आणि ओन्लीफॅन्सची क्रिएटर आहे. आज तिच्या टेक्सासमधील सुरेख आवाजामुळे दरमहा हजारो डॉलर्स कमवत आहे.
हॉली म्हणते, "मला माझा आवाज थोडा विचित्र वाटायचा, पण ब्रिटीश पुरुषांना तो खूप शांत आणि आकर्षक वाटतो. ते त्यासाठी वेडे होतात."
advertisement
हे कसं शक्य आहे? हा माणूस मरतच नाही, पुन्हा पुन्हा जिवंत होतो, 6 वेळा दफनभूमीतून परत आला
हॉली म्हणते की तिला अनेकदा 'डम्ब ब्लॉन्ड अमेरिकन'च्या स्टिरियोटाइपमध्ये टाकलं जात असे, पण आता हेच तिच्यासाठी वरदान बनलं आहे. "लोक मला कमी लेखतात, पण ते माझ्या बाजूनं काम करतं. माझा आवाज आज माझे सर्व बिल भरत आहे आणि त्याहूनही अधिक म्हणजे माझ्या यशात इतक्या साध्या गोष्टीने इतकी मोठी भूमिका बजावली हे विचार करून आश्चर्य वाटतं."
आज तिचे इन्स्टाग्रामवर 16 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ओन्लीफॅन्सवर तिचा चाहता वर्ग खूप मजबूत आहे, विशेषतः ब्रिटनमध्ये. हॉली फक्त व्हॉइस नोट्स रेकॉर्ड करून दरमहा सुमारे 20 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 17 लाख रुपये कमावते. याशिवाय तिचं सरासरी मासिक उत्पन्न सुमारे 80000 डॉलर्स म्हणजे 70 लाख रुपयेपर्यंत पोहोचतं. एक लहान अभिवादन जसं की गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट 20 डॉलर्स म्हणजे 1700 रुपये आणि वैयक्तिकृत, आक्षेपार्ह आवाज असलेल्या व्हॉइस नोट्स 100 डॉलर्सपर्यंत आहेत. ती एका वेळी मोबाईलवर 30 सेकंद बोलून शेकडो डॉलर्स कमावते. तिला दररोज 6 ते 8 व्हॉइस नोट रिक्वेस्ट मिळतात.
अरे देवा! चिरडायचा होता फक्त लिंबू, महिलेने 23 लाखांच्या कारचा केला चक्काचूर, घडलं काय?
चाहते फक्त तिचा आवाज ऐकू इच्छित नाहीत, तर बऱ्याचदा ते हॉलीला वेगवेगळी पात्रं साकारण्याची इच्छा व्यक्त करतात. काही तिला त्याच्या पत्नीची मैत्रीण, काही ऑफिसमधील सहकाऱ्याची आणि काही वहिनीची मैत्रीण होण्यास सांगतात. ती चाहत्यांची नावं घेऊन संदेश रेकॉर्ड करते जेणेकरून ते अधिक खरे वाटतील. काही डिमांड आणखी धक्कादायक आहेत. अनेक पुरुष तिला चर्च मिशनरी म्हणून भूमिका करण्याची विनंती करतात कारण होली स्वतः एकेकाळी चर्चशी संबंधित होती.
मॉर्मन चर्चची सदस्य असल्याने, जेव्हा तिचे ओन्लीफॅन्स अकाउंट उघड झालं तेव्हा तिच्या बिशपने तिला चर्च सोडण्यास भाग पाडलं. हॉली म्हणते की हा तिच्यासाठी कठीण काळ होता, पण तिने तो स्वीकारला.
2021 मध्ये हॉलीने नर्स रिक्रूटर म्हणून नोकरी सोडली आणि ओन्लीफॅन्समध्ये सामील झाली.
काही महिन्यांतच तिची कमाई गगनाला भिडली आणि एका महिन्यात तिने सुमारे 250000 डॉलर्स म्हणजे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावले. पण हा प्रवास सोपा नव्हता.