केचअपच्या पाकिटाचा जबरदस्त असा जुगाड, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. केचअपच्या पाकिटाचा असा वापर तुम्ही कधी पाहिला नसेल. एकदा हा तुम्ही हा व्हिडीओ पाहिला तर केचअपचं पाकिट कधीच फेकणार नाही.
आता नेमकं काय करायचं ते पाहुयात. व्हिडीओत दाखवल्यानुसार केचअपच्या पाकिटाच्या मधल्या भागापासून थोडं वर मार्करने एक आडवी लाइन मारा. आता या रेषेच्या दोन्ही बाजूंनी वर पाकिटाला मधेच जोडतील अशा दोन रेषा काढा. एकंदर काय तर आपल्याला त्रिकोण काढायचा आहे.
advertisement
Kitchen Jugaad Video : चपाती-भाकरी पटकन करून देणारा डबा
आता मार्क केलेला भाग कापून घ्या. वर तुम्हाला त्रिकोणी भाग दिसेल. त्याचा केचअपच्या पुढच्या भागाकडील भाग आडवा कापून टाका. आता तुम्हाला हे केचअपचं पाकिट एखाद्या वॉलेटसारखं दिसेल. आता वरच्या त्रिकोणी भागाच्या अगदी मधोमध एक छिद्र पाडा.
आता केचअपच्या पुढचा खालील चौकीनी भाग तिथं एक तितक्याच आकाराचं कापड चिकटवा. आता हे पाकिट तुम्ही किचनच्या तिथं कुठेतरी लटकवा. यासाठी खिळा मारायची गरज नाही. तर केचअपच्या पाकिटाचंच झाकण तुम्ही वापरू शकता. त्याला फेव्हीक्विक लावून ते भिंतीला लावा आणि यात तुम्ही तयार केलेलं केचअपचं पाकिट अडकवा. हे तुमचं एक किचन ऑर्गनाइझर तयार झालं. यात तुम्ही चमचे किंवा सुरी, चाकू अशा वस्तू ठेवू शकता.
याच पाकिटाचा दुसरा उपयोग म्हणजे जे पाकिट तुम्ही किचनमध्ये अडकवलं अगदी तसंच पाकीट तयार करून तुम्ही तुमच्या मुलांच्या स्टडी टेबलजवळ लावू शकता. ज्यात पेन, पेन्सिल अशा वस्तू ठेवता येतील.
Kitchen Jugaad Video : एका वाटीची कमाल, प्रेशर कुकर खराब होणारच नाही
तिसरं म्हणजे या बॅगचा आकार तुम्ही पाहिलात तर गरम पाण्याच्या पिशवीसारखा आहे. आपलं अंग दुखतं तेव्हा गरम पाण्याच्या पिशवीत पाणी भरून त्याने आपण अंग शेकवतो. गरम पाण्याची पिशवी नसेल तर तुम्ही या पिशवीत गरम पाणी ओतून त्याने अंग शेकवू शकता.
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला. तुम्ही केचअपच्या पाकिटाचा असा वापर कधी पाहिला होता का? किंवा तुम्ही याचा काय जुगाड करता आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.