PitruPaksha 2025: अपघाती, शस्त्राघाताने मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध-विधी करण्यासाठी सर्वात शुभ तिथी चुकवू नका
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
PitruPaksha 2025: अकाल मृत्यू झालेल्यांसाठी म्हणजे, ज्यांचा मृत्यू अपघातात, पाण्यात बुडून, विषबाधा किंवा शस्त्राच्या हल्ल्यामुळे झाला आहे, त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केले जाणारे श्राद्ध आणि तर्पण विधी मृतात्म्यांना...
मुंबई : पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी विशेष विधी करण्यासाठी पंचागात पितृपंधरवड्याची तरतूद आहे. पूर्वांजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पितृपक्षात श्राद्ध विधी पिंडदान करण्याला महत्त्व आहे. लोकांचे मृत्यू कसे झाले आहेत, यावरून श्राद्ध घालण्यासाठी काही ठराविक दिवस निश्चित केले आहेत, यापैकी एक म्हणजे चतुर्दशी महालय.
चतुर्दशी महालय ज्याला घात चतुर्दशी किंवा शस्त्रहत चतुर्दशी असेही म्हणतात, हा पितृपक्षातील एक विशेष दिवस आहे. ज्या व्यक्तींचा अपघाती, शस्त्राघाताने किंवा नैसर्गिक नसलेल्या कारणांनी मृत्यू झाला आहे, त्यांच्यासाठी या दिवशी श्राद्ध विधी केले जातात. असे मानले जाते की अशा लोकांचे श्राद्ध सामान्य तिथींना केले जात नाही, म्हणून त्यांच्या आत्म्यांना शांती देण्यासाठी चतुर्दशी महालय विशेष महत्त्वाचा आहे. यासाठीची शुभ तिथी यंदा 20 सप्टेंबर शनिवारी आहे.
advertisement
चतुर्दशी महालयाचे धार्मिक महत्त्व -
अकाल मृत्यू झालेल्यांसाठी म्हणजे, ज्यांचा मृत्यू अपघातात, पाण्यात बुडून, विषबाधा किंवा शस्त्राच्या हल्ल्यामुळे झाला आहे, त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केले जाणारे श्राद्ध आणि तर्पण विधी मृतात्म्यांना पुढील गती देतात आणि त्यांना पितृलोकात योग्य स्थान मिळते, अशी धार्मिक धारणा आहे. या विशेष विधीने प्रसन्न होऊन पूर्वज कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य यांचा आशीर्वाद देतात, असे मानले जाते.
advertisement
चतुर्दशी महालयाचे विधी -
चतुर्दशी महालयाचे विधी हे सामान्य श्राद्धाप्रमाणेच केले जातात, पण यात काही विशेष गोष्टींचा समावेश असतो. विधी सुरू करण्यापूर्वी घरातील सर्व सदस्यांनी स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान करावीत. एखाद्या अनुभवी आणि जाणकार पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली हे विधी करणे अधिक योग्य मानले जाते, कारण ते शास्त्रानुसार सर्व क्रिया योग्य प्रकारे पार पाडू शकतात. या दिवशी पवित्र नदीच्या किंवा जलाशयाच्या काठी जाऊन तर्पण विधी केला जातो. यामध्ये हाताच्या ओंजळीत तीळ, पाणी आणि फुले घेऊन पूर्वजांचे नाव घेऊन त्यांना अर्पण केले जाते. यामुळे त्यांच्या आत्म्यांना शांतता मिळते. गव्हाचे पीठ, तीळ आणि मध मिसळून तयार केलेल्या पिंडांचे दान केले जाते. हे पिंड मृतात्म्यासाठी अन्न मानले जातात. विधी पूर्ण झाल्यावर ब्राह्मणांना आदरपूर्वक भोजन दिले जाते आणि त्यांना दक्षिणा दिली जाते. शक्य असल्यास, गरजू व्यक्तींना किंवा भिक्षूंनाही अन्नदान करावे. या दिवशी श्रद्धापूर्वक विधी केल्यास पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबात शांती व समृद्धी नांदते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 12:30 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
PitruPaksha 2025: अपघाती, शस्त्राघाताने मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध-विधी करण्यासाठी सर्वात शुभ तिथी चुकवू नका


