Bhaubeej 2025: पुन्हा भाऊबीजेला राहुकाळ आडवा! भावाला ओवाळण्यासाठी या अशुभ वेळा टाळा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Bhaubeej 2025: भाऊ-बहिणींचा हा सण रक्षाबंधन इतकाच खास मानला जातो. भाऊबीज सणाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला औक्षण करून टिळा (तिलक) लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर भाऊ...
मुंबई : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला दरवर्षी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. यावर्षी भाऊबीज २३ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. दिवाळीत भाऊबिजेला विशेष महत्त्व आहे. भाऊ-बहिणींचा हा सण रक्षाबंधन इतकाच खास मानला जातो. भाऊबीज सणाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला औक्षण करून टिळा (तिलक) लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात.
द्रिक पंचांगनुसार, या वेळी भाऊबीजेला राहु काळाची अशुभ छाया राहणार आहे. राहु काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही. भाऊबीजेला राहु काळाची वेळ काय असेल आणि भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त काय असेल, त्याविषयी जाणून घेऊया.
राहु काळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत राहील?
यावेळी भाऊबीजेवर राहु काळाचा प्रभाव राहणार आहे. द्रिक पंचांगनुसार, राहु काळ २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल आणि २ वाजून ५४ मिनिटांनी समाप्त होईल. या काळात भावाला औक्षण-टिळा लावणं टाळावं.
advertisement
भाऊबीजेचे शुभ मुहूर्त -
पहिला मुहूर्त दुपारी १ वाजून १३ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल.
अभिजीत मुहूर्त असेल, सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होऊन दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल.
विजय मुहूर्त असेल, दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत.
गोधुली मुहूर्त असेल, ज्याची वेळ संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी ६ वाजून ०९ मिनिटांपर्यंत असेल.
advertisement
भावाला औक्षण-टिळा कसा लावावा -
या दिवशी भावाने सकाळी स्नान करावे. आपल्या बहिणीच्या घरी जावे आणि तिथे बहिणीच्या हातचे भोजन ग्रहण करावे. यानंतर बहिणी भावाला भोजन करवून, त्यानंतर औक्षण करावे. भावानं आपल्या शक्तीनुसार बहिणीला भेटवस्तू द्यावी.
भाऊबीजेचे उपाय -
टिळा लावताना बहिणीने भावाच्या कपाळावर चंदन किंवा केशरचा टिळा लावल्यास त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
advertisement
या दिवशी टिळा लावताना यमदेवासाठी दिवा (दीपक) देखील लावावा, ज्यामुळे अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 1:46 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Bhaubeej 2025: पुन्हा भाऊबीजेला राहुकाळ आडवा! भावाला ओवाळण्यासाठी या अशुभ वेळा टाळा