Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी दिवशी बाप्पा आणि शनिची कृपा; अशा पद्धतीनं केलेली पूजा फळदायी

Last Updated:

Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला महाराष्ट्रात गणेश मंदिरांमध्ये भाविक मोठी गर्दी करतात. संकष्टीनिमित्त गणेश पूजा करण्याची परंपरा आहे. महिन्याच्या दोन्ही चतुर्थी दिवशी श्री गणेशासाठी उपवास आणि पूजा-विधी केल्या जातात.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. दर महिन्याला गणेश भक्त मोठ्या भक्तीभावानं संकष्टी चतुर्थीचा उपवास-पूजा करतात. संकष्टीला महाराष्ट्रात गणेश मंदिरांमध्ये भाविक मोठी गर्दी करतात. संकष्टीनिमित्त गणेश पूजा करण्याची परंपरा आहे. महिन्याच्या दोन्ही चतुर्थी दिवशी श्री गणेशासाठी उपवास आणि पूजा-विधी केल्या जातात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. संकष्टीच्या दिवशी बाप्पाची पूजा केल्यानं त्याची कृपा होते, सर्व दुःख दूर होतात आणि आनंद आणि समृद्धी मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
संकष्टी चतुर्थीला शुभ योग -
या महिन्यात संकष्टी चतुर्थीला शुभ योग देखील तयार होत आहेत, ज्यामुळे संकष्टीचे महत्त्व आणखी वाढतंय. हा दिवस शिव आणि सिद्ध योगाचा संयोग आहे. याशिवाय, भाद्रपद आणि शिवपद योग तयार होत आहेत. या योगांमध्ये गणेशाची पूजा केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.
कॅलेंडरनुसार, नोव्हेंबर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३१ वाजता सुरू होईल आणि ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४:२४ वाजता संपेल. ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८:०२ वाजता चंद्र उगवणार आहे. संकष्टीचा चंद्रोदय झाल्यानंतर पूजन करून रात्री भोजन करावे
advertisement
संकष्टी चतुर्थीला पूजा आणि आरती करा -
चंद्रदोष दूर करण्यासाठी आणि जीवनातील अनेक विघ्न दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत अत्यंत फायदेशीर शुभ फळदायी मानलं जातं. या दिवशी श्री गणेशाची पूजा करून गणरायाला लाडू, मोदक आणि दुर्वा अर्पण करा. शेवटी, गणेशाची आरती करावी.
advertisement
गणेशाची आरती - 
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची। नूर्वी पूरवी प्रेम कृपा जयाची॥ सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ताफळाची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मनकामना पूर्ती॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चंदनाची उटी कुंकुम केशरा॥ हिरे जडित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मनकामना पूर्ती॥
advertisement
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना॥ दास रामाचा वाट पाहे सदना। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मनकामना पूर्ती॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी दिवशी बाप्पा आणि शनिची कृपा; अशा पद्धतीनं केलेली पूजा फळदायी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement